Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदारांच्या माहितीसाठी जिल्ह्यात 72 टक्के व्होटर स्लिपचे वाटप* *उर्वरित स्लिप वाटप मोहिम...

मतदारांच्या माहितीसाठी जिल्ह्यात 72 टक्के व्होटर स्लिपचे वाटप* *उर्वरित स्लिप वाटप मोहिम वेगात*

*
ठाणे, दि. 16 (जिमाका) – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तयारी झाली असून गटस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) मार्फत मतदारांना मतदार माहिती चिठ्ठ्यांचे (व्होटर स्लिप) वाटप करण्यात येत आहे. 145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 3,15,231 (61.71 टक्के) तर 140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात एवढे व्होटर स्लिप वाटण्यात आले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 5,26,7560 एवढ्या (72.86 टक्के) व्होटर स्लिपचे वाटप झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात मतदान वाढावे, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत असलेल्या अनुक्रमांक, मतदान केंद्र क्रमांक व मतदान खोली क्रमांक कळावे, यासाठी मतदार माहिती चिठ्ठीचे अर्थात व्होटर स्लिपचे वाटप बीएलओंमार्फत प्रत्येक मतदारसंघात करण्यात येत आहे. जिल्ह्यात 7,22,9339 एवढे मतदार असून त्यामधील १८ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 5,26,7560 एवढ्या व्होटर स्लिप वाटप करण्यात आल्या आहेत. उर्वरित 1,96,1779 व्होटर स्लिपचे वाटप करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
145 मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात एकूण 5,10,862 मतदार आहेत. त्यापैकी आजपर्यंत 3,15,231 मतदारांचे व्होटर स्लिप बीएलओंमार्फत वाटप करण्यात आले आहेत. ऊर्वरित 1,95,631 व्होटर स्लिप वाटण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत या मतदारसंघात 61.71 टक्के मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे.
140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात एकूण 3,74,664 मतदार संख्या आहे. यापैकी आतापर्यंत 3,18,895 एवढ्या व्होटर स्लिपचे वाटप करण्यात आले आहे. एकूण 85.17 टक्के व्होटर स्लिपचे वाटप झाले असल्याची माहिती अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
*विधानसभा मतदारसंघनिहाय व्होटर स्लिप वाटपाची आकडेवारी*
*मतदारसंघ, मतदार संख्या, वाटप केलेल्या स्लिपची संख्या आणि टक्केवारी*
134 भिवंडी ग्रामीण – मतदार- 337711, मतदार चिठ्ठी वाटप- 330421, टक्के- 97.84

135 शहापूर (अ.ज.) – 291057 – 270682 – 93.00

136 भिवंडी पश्चिम – 334037 – 223003 – 66.76

137 भिवंडी पूर्व – 373645 – 317618 – 85.01

138 कल्याण पश्चिम – 440597 – 198269 – 45.00

139 मुरबाड – 470040 – 374978 – 79.78

140 अंबरनाथ – 374664 – 318951 – 85.13

141 उल्हासनगर – 283379 – 229559 – 81.01

142 कल्याण पूर्व – 329173 – 144232 – 43.82

143 डोंबिवली – 313122 – 168746 – 53.89

144 कल्याण ग्रामीण – 510247 – 362939 – 71.13

145 मिराभाईंदर – 510862 – 315231 – 61.71

146 ओवळा माजिवडा – 545110 – 398309 – 73.07

147 कोपरी पाचपाखाडी – 339526 – 234589 – 69.09

148 ठाणे – 378207 – 302053 – 79.86

149 कळवा-मुंब्रा – 485324 – 301287 – 62.08

150 ऐरोली – 489059 – 456539 – 93.35

151 बेलापूर – 423579 – 320154 – 75.58

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments