Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedवेदनिर्मिती रियाल्टी पुरस्कृत दीक्षित लाईफस्टाईल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

वेदनिर्मिती रियाल्टी पुरस्कृत दीक्षित लाईफस्टाईल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

पुणे, 25 नोव्हेंबर 2024: वेदनिर्मिती रियाल्टी पुरस्कृत व अडोर ट्रस्ट आणि ब्लुब्रिगेड स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली दीक्षित लाईफस्टाईल हाफ मॅरेथॉन स्पर्धा पुण्यातील नेहरू स्टेडियम येथे येत्या 5 जानेवारी 2025 रोजी पार पडणार आहे. इतेकच नव्हे तर भारतातील नामवंत स्पर्धांच्या कार्यक्रम पत्रिकेत या स्पर्धेचा नियमित समावेश होण्याची निश्चिती झाली आहे.

अडोर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितले की, लठ्ठपणा आणि मधुमेह मुक्त जग करण्यासाठी 2013 मध्ये स्वर्गीय डॉ. श्रीकांत जीचकार यांच्या प्रेरणेने आम्ही दीक्षित जीवनशैलीच्या माध्यमातून “स्थुलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व” या अभियानाची सुरुवात केली. या जीवनशैली अंतर्गत दिवसभरात केवळ दोन वेळा भोजन व 4.5 किलो मीटर चालणे या दिनचर्येचा स्वीकार शेकडो नागरिकांनी केला. आज ही मोहीम 43 देशांमधील लाखो नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. त्यानंतर 2018 मध्ये पुणे येथे आम्ही असोसिएशन फॉर डायबिटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल(अडोर) या संस्थेची स्थापना केली. पुण्यात या संस्थेचे एक मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्र असून देशभरात अशी एकूण 14 केंद्रे आहेत. देशभरात 25000 हून अधिक मधुमेहींना या जीवन शैलीचा फायदा झाला आहे.

अडोर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ दीक्षित पुढे म्हणाले की, दीक्षित लाईफस्टाईल हाफ मॅरेथॉन शर्यतीत समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. केवळ नियमित धावपटूच नव्हे तर देशभरातील 22 राज्यांमधील दीक्षित लाईफस्टाईलचे सदस्यहि या स्पर्धेत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. तसेच जगभरातील 43 देशांमधील दीक्षित लाईफस्टाईलचे हजारो सदस्य या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या व्हरच्युअल रन स्पर्धेत सहभागी होतील. मधुमेह, लठ्ठपणा अशा जीवनशैली बिघडल्याने होणाऱ्या आजारांसाठी गोळ्या – औषधे नव्हे तर जीवनशैली सुधार हेच उत्तर असणार आहे, यावर विश्वास असणाऱ्या सुजाण नागरिकांना ते या अभियानाच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत हे दाखवून देण्याची ही मोठी संधी आहे.

वेदनिर्मिती रियाल्टीचे व्यवस्थापकीय संचालक गणेश जरांडे यावेळी म्हणाले की, या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत 3किमी फॅमिली वॉक किंवा फॅमिली रन, 5,10, 21 किमी धावण्याच्या नियमित स्पर्धांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी 10 डिसेंबर पर्यंत नावनोंदणी करणाऱ्यास नोंदणी शुल्कात 20टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच, सर्व सहभागी धावपटूंना लुल्ला नगर, कोथरूड, कात्रज कोंढवा, विमाननगर, सलिसबरी पार्क, एनआयबीएम, रहेजा व्हिस्टा आणि बाणेर अशा विविध ठिकाणी विनामूल्य विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी अजय देसाई यांच्याशी 9766353337 या क्रमांकावर अथवा https://www.bluebrigade.club संपर्क साधावा.

ब्लु ब्रिगेड स्पोर्टस फाउंडेशनचे संचालक प्रशांत पेठे म्हणाले की, मधुमेह या आजाराशी आमची भावनिक गुंतवणुक असून अडोर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने 2015 पासून ब्लु ब्रिगेड स्पोर्टस फाउंडेशन आपल्या तज्ञ मनुष्य बळाच्या साहाय्याने विविध मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करत आहे. पुणे व नाशिक येथेही आम्ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या संस्थेचा 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वेद निर्मिती रियाल्टीच्या सहकार्याने ब्लु ब्रिगेड स्पोर्टस फाउंडेशनने आयोजित केलेल्या एनडीए मॅरेथॉन स्पर्धेत 15000 हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता.
दीक्षित जीवनशैलीचा अंगीकार करणारे आणि तिचा पुरस्कार करणारे आणि हितचिंतक या सर्वांनी आपल्या मित्र मंडळी आणि कुटुंबीयांसोबत या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

———-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments