सुपर इंडियन बॉक्सर नीरज गोयतने ‘फिटर'(FITTR)’ ‘मीट अॅण्ड ग्रीट’ मध्ये सांगितला आपला अविश्वसनीय अनुभव
पुणे २९ नोव्हेंबर २०२४ – सुपर इंडियन बॉक्सर नीरज गोयतने आपला दर्जा आणि अनुभव दाखवून देत ब्राझीलच्या व्हिंडरसन न्युसचा पराभव करुन भारताचा अभिमान उंचावला. ‘फिटर'(FITTR)’ या आघाडीच्या ऑनलाईन फिटनेस आणि न्यूट्रिशियनच्या वतीने आयोजित केलेल्या मीट अॅण्ड ग्रीट मध्ये नीरजने आपला अविश्वसनीय अनुभव सांगितला.
टेक्सासमध्ये झालेल्या सुपर मिडलवेट लढतीत ब्राझीलच्या न्युन्सवर नीरजने शानदार विजय मिळवून दिला. ‘डब्ल्यूबीसी’ आशियाई विजेत्या नीरजने सुरुवातीपासून सामन्यावर वर्चस्व राखताना सहा फेरीच्या लढतीत आपला विजयाचा मार्ग निश्चित केला. जॅक पॉल आणि माईक टायसन यांचा समावेश असलेल्या मुख्य कार्यक्रमापूर्वी झालेल्या या लढतीस सुमारे ९० हजार चाहते उपस्थित होते. त्यामुळे हा विजय नीरजसाठी खास ठरला.
नीरज गोयतने या प्रवासात सहकार्य आणि सहाय्य केलेल्या ‘फिटर'(FITTR)चे आभार मानले. यात पाच लाख रुपयांचा समावेश होता.
‘एफआयटीटीआर’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितेंद्र चौक्से म्हणाले, ‘ही फक्त सुरुवात आहे. भारतीय क्रीडा क्षेत्र विस्तारत आहे आणि भविष्य आहे. ‘एफआयटीटीआर’ यामुळे यातील अधिक प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी सज्ज आहे. यामुळे देशाचा गौरव उंचावण्याासठी मदत होईल, असेही चौक्से म्हणाले.
यावेळी नीरज म्हणाला की, भारताचा बॉक्सर नीरज गोयतने व्यावयासिक बॉक्सिंगमध्ये दोन आठवड्यापूर्वी चमकदार कामगिरी केली. मात्र, त्याचदिवशी झालेल्या सुपर मिडलवेट गटातील माईक टायसन वि. जॅक पॉल या लढतीने नीरजची कामगिरी झाकोळली गेली.
अमेरिकेच्या टेक्सास येथील एटी अॅण्ड टी मैदानावर झालेल्या नीरजने ब्राझीलचा प्रतिस्पर्धी विंडरर्सन न्यून्सचा ६०-५४ असा पराभव केला. व्यावसायिक गटातील ही कुठलीही विजेतेपदाची लढत नव्हती. पण, नीरजने आपल्या वेगवान आणि आक्रमक खेळाने उपस्थितांवर छाप पाडली. सहा फेरीतच त्याने न्यून्सला निष्प्रभ केले. तेव्हा तीनही जज्जेसने नीरजच्या बाजूने कौल दिला. नीरजने या लढतीत न्यून्सवर वर्चस्व राखताना डाव्या हाताने हुकचे जबरदस्त फटके मारून न्यून्सला जेरीस आणले होते. नीरजच्या या आक्रमण पवित्र्याचा न्यून्स अखेरपर्यंत सामना करु शकला नाही.
हा विजय माझ्यासाठी खूप महत्वाचा असून, व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करण्याच्या दृष्टिने हे विजेतेपद ही पहिली पायरी असल्याचे नीरजने सांगितले. भारतासाठी ऑलिम्पिक खेळणे हे माझे स्वप्न होते. आसाठी प्रयत्न देखिल केले. पण, कदाचित ऑलिम्पिक माझ्या नशिबात नसावे. तेथेच मी ऑलिम्पिक प्रवास सोडून देण्याचा निर्णय घेतला. आता ऑलिम्पिकपासून खूप दूर गेलो आहे. अमेरिकेतील व्यावसायिक बॉक्सिंग संस्कृतीशी मी चांगले जुळवून घेतले आहे, असे नीरजने सांगितले.
व्यावसायिक बॉक्सिंग खेळताना सरकारची मान्यता वगैरेचा काहीच संबंध नसतो. आम्हाला महत्वाचे असते, ते प्रायोजकत्व आणि ते मिळाले की आम्ही कुठेही खेळू शकतोल. बॉक्सिंग हा खेळ असा आहे, की तो प्रत्येक घराघरात खेळला जायला हवा. या खेळामुळे मानसिक आणि शारीरिक संतुलन चांगले रहायला मदत होते, असा सल्लाही नीरजने या वेळी दिला.
नीरजने या वेळी पुण्याशी आपले जुने नाते असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘वयाच्या तेराव्या वर्षी बॉक्सिंग खेळाला सुरुवात केली, तेव्हा येथील लष्कराच्या क्रीडा केंद्रातून सुरुवात झाले. येथेच मी घडलो. त्यामुळे माझ्यासाठी या केंद्राला खूप महत्व आहे. केवळ मीच नाही, तर भालाफेकखेळाडू नीरज चोप्रासारखे अनेक खेळाडू या केंद्राने भारताला दिले आहेत. भारताच्या क्रीडा क्षेत्रात या केंद्राचे खूप मोठे योगदान आहे.’