प्रेमोत्सवातून महावतार बाबाजींच्या चरणी विश्व कल्याण प्रार्थना आज (दि. ३०)* *डॉ. ज्योती मुंडर्गी यांची प्रमुख उपस्थिती ; शांतीमंत्र व भजन कार्यक्रम*

तारां कित Avatar

*

पुणे : अनंतामधून होणाऱ्या अध्यात्मिक प्रेम ऊर्जेचा वर्षाव महावतार बाबाजी यांच्याकडून विश्वावर अव्याहत व निरपेक्षपणे होत आहे. पुण्यात १७ व्या महावतार बाबाजी प्रेमोत्सव सोहळ्यानिमित्त बाबाजींच्या चरणी विश्व कल्याण प्रार्थना व विविध कार्यक्रमांचे आयोजन शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कर्वे रस्त्याजवळील कोहिनूर मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे.

प्रेमोत्सवाचे प्रेरणास्थान श्री विद्यासागरजी असून डॉ. ज्योती मुंडर्गी यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला असणार आहे. कार्यक्रमात शांतीमंत्र, प्रेमोत्सव परिचय, भजन, ओंकार, मुख्य अतिथींचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. तरी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Tagged in :

तारां कित Avatar