जागतिक दिव्यांग दिन” ३ डिसेंबर २०२४

तारां कित Avatar

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत मंगळवार, दिनांक ३ डिसेंबर, २०२४ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत “जागतिक दिव्यांग दिन” साजरा करणेत येणार आहे.

त्या अनुषंगाने विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दिव्यांग संबंधित उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना तसेच विशेष प्राविण्य प्राप्त दिव्यांग नागरीक, विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ तसेच दिव्यांगांसाठी नवीन योजनांचे उदघाटन व माहिती, दिव्यांग कल्याणकारी योजना माहिती, दिव्यांगांसाठी मार्गदर्शन, स्नेह भोजन व सांस्कृतिक कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करणेत आले आहे. तरी सदर कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरातील सर्व दिव्यांग बंधू-भगिनीनी उपस्थित रहावे असे आवाहन समाज विकास विभाग, दिव्यांग कक्षाच्या वतीने करणेत येत आहे.

Tagged in :

तारां कित Avatar