Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीएमआरडीएच्या सदन‍िका लॉटरी अर्जाच्या प्रक्रियेस मुदतवाढ

पीएमआरडीएच्या सदन‍िका लॉटरी अर्जाच्या प्रक्रियेस मुदतवाढ

पुणे / पिंपरी (दि.२९) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२ आण‍ि पेठ क्रमांक ३०-३२ येथील शिल्लक असलेल्या सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागव‍िण्यात येत आहे. व‍िधानसभा न‍िवडणुकीत शासकीय यंत्रणा व्यस्त असल्याने नागर‍िकांना आवश्यक कागदपत्रे म‍िळण्यास वेळ लागला. त्यामुळे नागर‍िकांच्या अडचणी लक्ष्यात घेता पीएमआरडीएने १५ ड‍िसेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ द‍िली आहे.

पीएमआरडीएच्या या गृहप्रकल्पांतर्गत पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ईडब्ल्यूएसमध्ये ४७ व एलआयजी प्रवर्गातील ६१४ सदनिका आहे. यासह पेठ क्र. ३०-३२ येथील ईडब्ल्यूएस (1 आरके) प्रवर्गातील ३४७ व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १३३७ शिल्लक सदनिकांसाठी इच्छुकांकडून १२ नोव्हेबरपर्यंत अर्ज मागव‍िण्याची मुदत संपुष्टात आल्याने प्रथम मुदतवाढ ३० नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती. पण व‍िधानसभा न‍िवडणूक २०२४ यात शासकीय यंत्रणा व्यस्त असल्याने नागर‍िकांना उत्पन्नाचा दाखला व डोमासाईल प्रमाणपत्र म‍िळव‍िण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे सदन‍िकेच्या लॉटरी कर‍िता अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी नागर‍िकांमधून असल्याने अंत‍िम मुदतवाढ १५ ड‍िसेंबरपर्यंत वाढव‍िण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी ही शेवटची संधी असल्याने याचा अध‍िकाध‍िक नागर‍िकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

सुधार‍ित वेळापत्रक
सुधार‍ित वेळापत्रकानुसार इच्छुकांना इच्छुकांना सदन‍िकेच्या लॉटरीसाठी १५ ड‍िसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. यानंतर १ जानेवारीला सोडतीसाठी अर्जाची स्वीकृत प्रारुप यादी प्रसिद्ध करत त्यावर २ ड‍िसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. १३ जानेवारीला सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंत‍िम यादी प्रसिद्ध करत २१ जानेवारीला ड्राय रननंतर २२ जानेवारीला अंत‍िम सोडत काढल्यानंतर पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर सोडतीमधील यशस्वी व प्रत‍िक्षा यादीवरील अर्जदारांची नावे प्रसिद्ध होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी – Helpline No.- ०७३१६९०५७४५
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ – https://housing.pmrda.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments