महाराष्ट्र म्हणजे कबड्डीचे धडधडणरे हृदय – मनप्रीत सिंग ‘पीकेएल’च्या पुण्यातील अखेरच्या टप्प्यासाठी खेळाडू उत्सुक

तारां कित Avatar

नोएडा ३० नोव्हेंबर २०२४ – प्रो कबड्डीच्य ११व्या पर्वातील नोएडा येथील दुसरा टप्पा संपून आता पुण्यातील अखेरच्या टप्प्याचे सर्वाना वेधे लागले आहेत. अर्थात, पुण्याला येत असताना गुणतालिकेत फार काही मोठा बदल नाही. सातत्यपूर्ण कामगिरी करणारा हरियाना स्टिलर्स संघ गुणतालिकेत आघाडी टिकवून आहे.

कबड्डीच्या सांस्कृतिक महत्वावर उत्कट प्रतिक्रिया देताना हरियाना स्टिलर्सचे प्रशिक्षक मनप्रीत ससिंग म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि कबड्डी यांचे खूप जुने अतूट नाते आहे. येथे खऱ्या अर्थाने कबड्डीचे हृदय धडधडते. स्टिलर्सने आणखी एक एकतर्फी विजय मिळविताना तमिळ थलैवाजवर ४२-३० असा विजय मिळवून नोएडा टप्प्याचा यशस्वी शेवट केला.’

महाराष्ट्रातील कबड्डीच्या चाहता वर्गाच्या प्रेमावर भाष्य करताना मनप्रीत यांनी महाराष्ट्राचे सुरेख चित्र उभे केले. जेव्हा महाराष्ट्रात प्रेक्षकवर्ग मैदानात सामना बघायला येतो, तेव्हा तो फक्त संघ नाही बघत नाही, तर कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी ते आलेले असतात, असे मनप्रीत म्हणाले.

जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात जाता आणि कुस्ती किंवा कबड्डीमध्ये चांगले खेळता, तेव्हा ते तुमच्या मनाशी जोडले गेले आहेत असे वाटते. तुम्हाला त्यांचे मर्म अनुभवता येते. लोक आणि चाहते यांच्यातील गहन नाते येथे पहायला मिळते, असेही मनप्रीत यांनी सांगितले.

महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेचे नुसते कौतुक केले जात नाही, तर त्याचा आदर केला जातो. जेव्हा एखादा खेळाडू चांहगला खेळतो, मग तो भारताच्या कोणत्याही भागाचा असू देत, महाराष्ट्रातील लोक त्याला अक्षरशः डोक्यावर घेतात, अशा आठवणीने मनप्रीत यांनी राज्याच्या क्रीडा संस्कृती आणि उत्कट स्वरुपावरप प्रकाश टाकला.

१ डिसोबर रोजी होणाऱ्या सामन्याचे पुर्वावलोकन –
तमिळ थलैवाज अखेरच्या टप्प्याची सुरुवात दबंग दिल्लीविरुद्ध करेल, तेव्हा, ते हरियाना स्टिलर्सकडून अखेरच्या सामन्यात झालेल्या पराभवातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील. बचावातील त्रुटींवर मात करण्यासाठी नवीन कुमार आणि आशु मलिक यांना अखेरच्या टप्प्यात खेळताना मिळालेल्या संधीचा फायदा उचलावा लागेल.

संध्याकाळचा दुसरा सामना बंगाल वॉरियर्स आणि पाटणा पायरेट्स यांच्यात खेळविला जाईल. पाटणा पायरेट्सची ताकद त्यांच्या चढाईपटूंवर असेल. त्याचवेळी बंगाल वॉरियर्स पराभवाची मलिका संपविण्यसाठी कठोर मेहनत घेईल. बंगाल वॉरियर्ससाठी सर्व नजरा नितीन कुमारवर असतील. या गुणी युवा खेळाडूने आपली योग्यता सिद्ध केली आहे. परंतु, त्याला संघातील अन्य सहकार्यांकडून फारशी साथ मिळालेली नाही.

असे होतील रविवारचे सामने –
सामना १ – पाटणा पायरेट्स वि. बंगळुरु बुल्स – रात्री ८ वाजता
सामना २ – जयपूर पिंक पॅंथर्स वि.वि. तेलुगु टायटन्स – रात्री ९ वाजता

प्रो कबड्डी लीगच्या सर्व ताज्या घडामोडींसाठी www.prokabaddi.com वर लॉग इन करा, अधिकृत प्रो कबड्डी ॲप डाउनलोड करा किंवा @prokabaddi ला Instagram, YouTube, Facebook आणि X वर फॉलो करा.

प्रो कबड्डी लीगच्या ११ व्या हंगामाचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने + हॉटस्टारवरुन थेट प्रक्षेपण केले जाईल.

Tagged in :

तारां कित Avatar