Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedसफर लंडनची' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (दि.७). ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांची...

सफर लंडनची’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (दि.७). ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांची उपस्थिती : तसेच ” सफर ऑस्ट्रेलियाची'” या सुहास जोशी लिखीत मराठी पुस्तकाचे इंग्रजी अनुवादित पुस्तक प्रकाशन सोहळा

पुणे : सुहास जोशी लिखित ‘सफर लंडनची’ पुस्तकाचा आणि ‘सफर ऑस्ट्रेलियाची’ पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दिनांक ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जंगली महाराज रस्त्यावरील सेंट्रल पार्क हॉटेल येथे प्रकाशन सोहळा होणार आहे.

कार्यक्रमाला ऑस्ट्रेलिया देशाच्या पर्यटन विभागाच्या ‘टुरिझम ऑस्ट्रेलिया’ चे भारत व गल्फ या देशांचे व्यवस्थापक निशांत काशीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर आणि सीमास ट्रॅव्हल्सचे डॉ. विश्वास केळकर, गिरीकंद ट्रॅव्हल्सचे अखिलेश जोशी, भाग्यश्री ट्रॅव्हल्सचे विवेक गोळे, ज्येष्ठ पत्रकार विद्याधर ताठे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सुहास जोशी यांची यापूर्वी क्रिएटिव्ह मराठी इंडियन इन ऑस्ट्रेलिया या मुद्द्यावर आधारित ‘स्नेहबंध गोष्ट ऑस्ट्रेलियातील भारतीयांची’ हे पुस्तक आणि ‘शतदा प्रेम करावे’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती ७ डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. “सफर ऑस्ट्रेलियाची” या पुस्तकाच्या तीन आवृत्ती आणि हिंदी अनुवाद आवृत्ती यापूर्वी प्रकाशित झाल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments