राज्यस्तरीय गो आधारित शेती प्रशिक्षक चिंतन आणि प्रशिक्षण नियोजन बैठक बुधवारी (दि.११) महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यांच्या सहकार्याने आयोजन

तारां कित Avatar

पुणे : महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय गो आधारित शेती प्रशिक्षक चिंतन व महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण नियोजन बैठकीचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. बुधवार दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता औंध मधील पशुसंवर्धन आयुक्तालय येथे ही बैठक होणार आहे, अशी माहिती गो सेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा व राष्ट्रीय कर्तव्य अभियान महाराष्ट्रचे मुख्य संयोजक विजय वरुडकर यांनी दिली.

या बैठकीला गोसेवा आयोग महाराष्ट्राचे अध्यक्ष शेखर मुंदडा, अहमदाबाद येथील बन्सी गीर गोशाळेचे गोपाल सुतारिया, गोसेवा आयोगाच्या सदस्य सचिव मंजुषा पुंडलिक, सदस्य संजय भोसले, सनत गुप्ता, उद्धव नेरकर, डॉ सुनील सुर्यवंशी, नितीन मार्कंडेय, मनीष वर्मा, गो कृषी तज्ञ तात्या मगर, पुनम राऊत उपस्थित राहणार आहेत.

शेखर मुंदडा यांनी सांगितले या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील अनेक तालुक्यात नैसर्गिक शेती प्रशिक्षण नियोजन करण्यात येणार आहे. या विषयी पूर्व नियोजन म्हणून बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच गो सेवा आयोग शासकीय योजना माहिती देण्यात येणार आहे.

विजय वरुडकर म्हणाले, गो आधारित शेती किंवा नैसर्गिक शेती प्रशिक्षण, रासायनिक शेती आणि देशी गोवंश आधारित शेती याचा तुलनात्मक अभ्यास प्रशिक्षण, कामधेनु कृषी तंत्र, गोआधारित शेतीमधील विविध पद्धती, महाराष्ट्र गोहत्या बंदी अधिनियम माहिती यांसह गो आधारित कृषीतून सर्वांगीण ग्रामविकास, देशी गो वंशाचे नैसर्गिक शेतीतील आवश्यकता व महत्त्व गो आधारित शेतीतील यशोगाथा या विषयावर देखील मान्यवर बोलणार आहेत.

गो सेवा आयोग माध्यमातून डॉ. सुनील सूर्यवंशी जिल्हा निहाय गोशाळा यांचे प्रशिक्षण व उद्धव नेरकर हे तालुका निहाय प्रशिक्षण सत्रांचे नियोजन करीत आहेत. या बैठक अथवा कार्यशाळा नोंदणी साठी 8446004580 या क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन संयोजक समिती द्वारे करण्यात आले

फोन – 8446004580

Tagged in :

तारां कित Avatar