Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा कॅपिटल देणार महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्रावर मोठा भर ...

टाटा कॅपिटल देणार महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्रावर मोठा भर उत्पादन, माहिती तंत्रज्ञान सेवा, औषधनिर्माण, रसायने, ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्यसेवा, वाहन उद्योग यावर विशेष लक्ष

नागपूर, 11 डिसेंबर: टाटा सन्सची प्रमुख वित्तीय सेवा शाखा टाटा कॅपिटल लि. ने महाराष्ट्रात एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) कर्जांसाठी मागणीत मोठी वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. वैविध्यपूर्ण उद्योगांच्या पार्श्वभूमीसह महाराष्ट्र ही टाटा कॅपिटलच्या एमएसएमई पोर्टफोलिओमध्ये महत्त्वाचा वाटा उचलणारी एक प्रमुख विकास बाजारपेठ राहिली आहे.

टाटा कॅपिटलने महाराष्ट्रातील आपले जाळे 50 शाखांपर्यंत वाढवले असून ठाणे, नाशिक आणि चंद्रपूरसारख्या टियर I व टियर III शहरांमध्ये आपली पोहोच आणखी मजबूत केली आहे. या नेटवर्क विस्तारामुळे कंपनीला उत्पादन, माहिती तंत्रज्ञान सेवा, औषधनिर्माण, रसायने, ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्यसेवा, वाहन उद्योग क्षेत्रांतील एमएसएमईंच्या विविध आर्थिक गरजा अधिक परिणामकारकपणे पूर्ण करता येणार आहेत.

महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्राचा कंपनीच्या एकूण एमएसएमई कर्ज पोर्टफोलिओत सुमारे 40% वाटा आहे. व्यवसायाची ही दिशा छोट्या उद्योगांना त्यांची अल्पकालीन व दीर्घकालीन आर्थिक गरजा भागवून राज्यातील छोट्या उद्योगांवर लक्ष केंद्रित करत आहे. आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या सहामाहीअखेर, टाटा कॅपिटलच्या एकूण कर्ज पोर्टफोलिओचे मूल्य 176,000 लाख कोटी रु. पेक्षा अधिक होते.

कंपनीच्या अल्पकालीन कर्ज उपाययोजनांमध्ये वर्किंग कॅपिटल लोनचा समावेश होतो. हे व्यवसायांना त्यांच्या चालू खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी, व्यापार किंवा उत्पादनासाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी आणि विक्रीनंतरच्या देयकांचे व्यवस्थापन करण्यासाठी मदत करते. याशिवाय, टाटा कॅपिटलच्या दीर्घकालीन वित्तपुरवठा उपायांमध्ये व्यवसाय विस्तारासाठी उपकरण कर्ज आणि प्रोजेक्ट टर्म लोन यांचा समावेश आहे.

टाटा कॅपिटल मालमत्तेवर आधारित लीजिंग उपाय देखील देते. त्यामध्ये प्रकल्प व यंत्रसामुग्री, आयटी हार्डवेअर, पायाभूत सुविधा आणि वाहतूक उपकरणांसारख्या विविध श्रेणींचा समावेश आहे. या सर्वसमावेशक उपाययोजनांमुळे उत्पादन, व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील एमएसएमईंना त्यांच्या बदलत्या व्यवसाय गरजांसाठी अनुकूलित आर्थिक उपाय मिळू शकतात.

टाटा कॅपिटलची एमएसएमई कर्जे प्रगत ऑनबोर्डिंग आणि क्रेडिट एनेबलिंग साधनांनी सुसज्ज आहेत. त्यामुळे मंजुरी प्रक्रियेत जलद निर्णय घेता येतो. आमच्या 95% पेक्षा जास्त सेवा डिजिटल स्वरूपात सक्षम असून, ग्राहकांना अखंड विनाअडथळा अनुभव देण्याबरोबरच कर्ज मंजुरी आणि वितरणाची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात.

टाटा कॅपिटलचे एसएमई फायनान्सचे सीओओ श्री. नरेंद्र कामत म्हणाले, “महाराष्ट्र हे आपली उद्योजकीय वृत्ती आणि गुंतवणुकीच्या संधींमुळे आमच्या व्यवसाय धोरणामध्ये नेहमीच महत्त्वाचे क्षेत्र राहिले आहे. महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्र झपाट्याने प्रगती करत आहे आणि आमच्या वित्तीय उपाययोजनांची मागणी वाढताना दिसत आहे. आमच्या डिजिटल साधनांमुळे एमएसएमईंना आमच्या वित्तीय सेवा सोयीस्करपणे आणि कमी वेळेत उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.”

Previous article
Next article
महिंद्राने दिल्लीतील BAUMA CONEXPO मध्ये लाँच केली अत्याधुनिक CEV-V श्रेणीतील बांधकाम उपकरणे महिंद्राकडून बांधकाम उपकरणांची नवीन CEV5 श्रेणी लाँच : विद्यमान वर अपग्रेड अर्थमास्तर – बॅकहो लोडर आणि रोडमास्टर – CEV5 उत्सर्जन मानकांसह उच्च पॉवर इंजिनसह मोटर ग्रेडर. महिंद्रा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट (MCE) उच्च ऑपरेटरच्या उत्पादकतेसाठी नवीन मोठी आणि आरामदायी केबिन सादर करत आहे. जलद रस्ता बांधकामासाठी उच्च शक्तीसह महिंद्राची रोडमास्टर G100. महिंद्रा रोडमास्टर G80 मोटार ग्रेडर लहान कंत्राटदारांना उप-इष्टतम ग्रेडिंग पद्धतींपासून मुक्त होण्यास मदत करण्यासाठी आणि स्वतःला यांत्रिकीकरण, मॅन्युअल लेबर व मेक-शिफ्ट फार्म ट्रॅक्टर-आधारित ग्रेडरपासून मुक्त करण्यात मदत करेल. तसेच महिंद्रा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट (MCE) घोषणा करते अपटाइम सेवा हमी: जर बंद पडलेले यंत्र 48 तासांच्या आत पुन्हा सुरू झाले ना ही, तर प्रति दिवस ₹1,000 मिळतील. याला सतत वाढणाऱ्या आणि विस्तृत सेवा व स्पेअर्स नेटवर्कचा पाठिंबा मिळेल. ज्यामध्ये 50+ 3S डीलरशिप्स आणि साथी+ (अधिकृत सेवा व पार्ट्स केंद्रे) यांचा समावेश आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments