Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedसार्वजनिक बांधकाम विभागाच्यावीने कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेटचा...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावीने कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन

पुणे, दि. 11 : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाच्यावतीने विश्वेश्वरय्या हॉल येथे आयोजित रस्ते सुरक्षा अभियान व जागृती कार्यक्रमाच्यावेळी मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या हस्ते विभागातील 15 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात हेल्मेटचे वितरण करण्यात आले.

यावेळी पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, सातारा मंडळाचे एस. बी. रोकडे, कोल्हापूर मंडळाचे टी.ए. बुरुड, सोलापूर मंडळाचे एस.एस. माळी आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेल्मेट वापरण्याबाबत जागृती करण्यासोबतच प्रत्यक्षात हेल्मेट घालण्यास प्रवृत्त करण्याचा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्याकरीता हेल्मेट वितरणाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंडळामार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकूण 500 हेल्मेटचे वितरण करण्यात येणार आहे. रस्ते सुरक्षा अभियान व जागृतीबाबतची संकल्पना पुणे प्रादेशिक विभागातील सातारा, कोल्हापूर व सोलापूर मंडळानेही याप्रमाणे कार्यवाही करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याबाबत श्री. चव्हाण यांनी आवाहन केले.

Previous article
महिंद्राने दिल्लीतील BAUMA CONEXPO मध्ये लाँच केली अत्याधुनिक CEV-V श्रेणीतील बांधकाम उपकरणे महिंद्राकडून बांधकाम उपकरणांची नवीन CEV5 श्रेणी लाँच : विद्यमान वर अपग्रेड अर्थमास्तर – बॅकहो लोडर आणि रोडमास्टर – CEV5 उत्सर्जन मानकांसह उच्च पॉवर इंजिनसह मोटर ग्रेडर. महिंद्रा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट (MCE) उच्च ऑपरेटरच्या उत्पादकतेसाठी नवीन मोठी आणि आरामदायी केबिन सादर करत आहे. जलद रस्ता बांधकामासाठी उच्च शक्तीसह महिंद्राची रोडमास्टर G100. महिंद्रा रोडमास्टर G80 मोटार ग्रेडर लहान कंत्राटदारांना उप-इष्टतम ग्रेडिंग पद्धतींपासून मुक्त होण्यास मदत करण्यासाठी आणि स्वतःला यांत्रिकीकरण, मॅन्युअल लेबर व मेक-शिफ्ट फार्म ट्रॅक्टर-आधारित ग्रेडरपासून मुक्त करण्यात मदत करेल. तसेच महिंद्रा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट (MCE) घोषणा करते अपटाइम सेवा हमी: जर बंद पडलेले यंत्र 48 तासांच्या आत पुन्हा सुरू झाले ना ही, तर प्रति दिवस ₹1,000 मिळतील. याला सतत वाढणाऱ्या आणि विस्तृत सेवा व स्पेअर्स नेटवर्कचा पाठिंबा मिळेल. ज्यामध्ये 50+ 3S डीलरशिप्स आणि साथी+ (अधिकृत सेवा व पार्ट्स केंद्रे) यांचा समावेश आहे.
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments