Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्टार अॅग्रीवेअरहाउसिंग अँड कोलॅट्रल मॅनेजमेंट लिमिटेडतर्फे SEBI कडे DRHP सादर

स्टार अॅग्रीवेअरहाउसिंग अँड कोलॅट्रल मॅनेजमेंट लिमिटेडतर्फे SEBI कडे DRHP सादर

स्टार अॅग्रीवेअरहाउसिंग अँड कोलॅट्रल मॅनेजमेंट लिमिटेडने त्यांचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे दाखल केले आहे.

ही कंपनी एक तंत्रज्ञान प्रणीत एकत्रित कृषी मूल्य-साखळी सेवा प्लॅटफॉर्म आहे. कंपनी खरेदी, व्यापार सुलभता, गोदाम व्यवस्थापन, कोलॅट्रल व्यवस्थापन, वित्तीय उपाय, डिजिटल मार्केटप्लेस आणि तंत्रज्ञानावर आधारित मूल्यवर्धित डेटा सेवा यासारख्या सेवा पुरवते.

कंपनी प्राथमिक समभाग विक्री (IPO) द्वारे निधी उभारण्याची योजना आखत आहे. एकूण इश्यूमध्ये 4,500 दशलक्ष रु. (450 कोटी) चा फ्रेश इश्यू आणि 26,919,270 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर-फॉर-सेल समाविष्ट आहे. (“Total Offer Size”)

कंपनीने निव्वळ उत्पन्नाचा उपयोग पुढील गोष्टींसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे: (i) कंपनीच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता काही प्रमाणात भागविण्यासाठी 1,200 दशलक्ष रु. (120 कोटी रु.) (ii) कंपनीच्या मटेरियल सबसिडरीच्या FFIPL साठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता काही प्रमाणात भागविण्यासाठी 1,250 दशलक्ष रु. (125 कोटी रु.) (iii) मटेरियल सबसिडियरी AFL मध्ये 1,000 दशलक्ष रु. (100 कोटी रु.) भांडवल वाढविण्यासाठी निधी भरणे आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरणे. (“Objects of the Offer”)

ऑफर फॉर सेल मध्ये अमिथ अग्रवाल यांच्या द्वारे 1,318,126 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अमित गोयल यांच्या द्वारे 4,393,754 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अमित खंडेलवाल यांच्या द्वारे 15,005 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, सुरेश चंद्र गोयल यांच्या द्वारे 1,500,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे “प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स”) समाविष्ट आहेत. देवकीनंदन गुप्ता यांच्या द्वारे 1,500,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, श्रीकृष्ण अग्रवाल यांच्या द्वारे 219,688 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, प्रमोद अग्रवाल यांच्या द्वारे 878,751 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, सुमित्रा देवी गोयल यांच्या द्वारे 500,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अंकुश गुप्ता यांच्या द्वारे 500,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे “प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर्स”) समाविष्ट आहेत. क्लेमोर इन्व्हेस्टमेंट्स (Mauritius) लिमिटेड यांच्या द्वारे 11,980,508 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (“इन्ह्वेस्टर सेलिंग शेअरहोल्डर्स”) (एकत्रितपणे “टोटल सेलिंग शेअरहोल्डर्स”) आहेत.

जेएम फायनान्शियल लिमिटेड, अँबिट प्रायव्हेट लिमिटेड आणि इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

एकात्मिक कृषी सेवा कंपन्यांमध्ये F&S रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष 2022 ते 2024 दरम्यान महसूलाच्या आधारावर सर्वात मोठी कंपनी आणि सर्वाधिक फायदेशीर तंत्रज्ञान आधारित एकत्रित मूल्य साखळी सेवा प्लॅटफॉर्म म्हणून कंपनीची ओळख आहे.

30 जून 2024 पर्यंत, भारतातील कृषी वस्तूंवर आधारित वित्तपुरवठा (कोलॅट्रल मॅनेजमेंट) क्षेत्रात कंपनी सर्वात आघाडीवर असून 130 ते 165 बिलियन रु. दरम्यान AUM आणि 4.5 ते 5.2 MMT च्या सर्वाधिक कृषी वेअरहाउसिंग क्षमतेसह अग्रगण्य आहे.

DRHP लिंक: https://www.bseindia.com/corporates/download/321912/IPO%20Prior/241204_Abhay_Consolidated_20241204162939.pdf

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments