Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील पहिले वर्ल्ड ऑफ इल्युजन्स कोपा मॉल येथे

पुण्यातील पहिले वर्ल्ड ऑफ इल्युजन्स कोपा मॉल येथे

पुणे, १२ डिसेंबर २०२४ – या डिसेंबर महिन्यात कोपा मॉल या पुण्यातील लोकप्रिय लाइफस्टाइल डेस्टिनेशनमध्ये आभासी जग आणि कल्पनेतलं जग पहिल्यांदाच वर्ल्ड ऑफ इल्युजन्सच्या माध्यमातून जिवंत होणार आहे. १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान हा अनोखा अनुभव घेता येणार असून त्यात १२ आभासी स्टेप्सचा समावेश आहे. सर्व वयोगटाच्या नागरिकांना हा अनुभव घेऊन अविस्मरणीय आठवणी गोळा करता येणार आहेत.

मनाला चक्रावून टाकणारे अपसाइड डाउन हाउस, तुमच्या जगाला नवा दृष्टीकोन देईल, तर इन्फिनाइट यू मध्ये कॅलिडोस्कोपची अगणित प्रतिबिंबे पाहाता येतील. वर्ल्ड ऑफ इल्युजन्समध्ये विविध आकर्षणांचा समावेश करण्यात आला आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये फ्लोटिंग फॉरेस्टचा समावेश करण्यात आला आहे व त्यात सगळ्यात लहान प्रेक्षकही भव्य स्वरूपात दिसेल. बबल ट्रॅपमध्ये अगणित शक्यतांमधून अद्भुत अनुभव घेता येईल. यातले प्रत्येक इल्युजन आकर्षक व्हिज्युअल्स दर्शवणारे असून त्यातून अविस्मरणीय फोटो घेता येतील.

तुम्ही संवादी कलेचे चाहते असाल, किंवा इन्स्टाग्रामचे चाहते किंवा फक्त कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी उत्सुक असाल, वर्ल्ड ऑफ इल्युजन्समध्ये अनोखा आणि मनोरंजक अनुभव घेता येईल. ही मजेदार अनुभूती घेण्यासाठी लवकरच तिकीट बुक करा आणि सुट्टीच्या काळाचा आनंद द्विगुणित करा.

स्थळ : अट्रियम, कोपा मॉल

तारीख : १४ डिसेंबरपासून

वेळ : दुपारी १२ वाजल्यानंतर

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments