नवी दिल्ली, 15 डिसेंबर २०२४: पूर्वाश्रमीच्या मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने कॉर्पोरेट आणि नियामक मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आपल्या कॉर्पोरेट नावात ‘अॅक्सिस’ हा शब्द जोडण्यात आल्याची घोषणा केली असून ही कंपनी आता अॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स लि. (“अॅक्सिस मॅक्स लाइफ”/ “कंपनी”) या नावाने ओळखली जाईल. याशिवाय या कंपनीचे ब्रँडिंगही अॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स असे झाले आहे. हा या ब्रँडसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. आर्थिक सेवा क्षेत्रातील दोन विश्वासू नावे एकत्र आल्यामुळे कंपनीला महानगरे आणि टियर १ शहरांपलीकडे जाऊन धोरणात्मक विस्तार करता येईल आणि दीर्घकालीन प्रगती साध्य करता येईल.
या ब्रँडची नवीन ओळख त्याच्या नवीन लोगोमधून दिसून येते. अॅक्सिसची ओळख असलेले ‘ए’ हे आद्याक्षर आणि बरगंडी शेड त्यात समाविष्ट करण्यात आली आहे. ब्रँडची नवीन ओळख तसेच नवीन कॉर्पोरेट नाव आणि लोगो हे कंपनीच्या प्रमुख भागधारकांनी केलेल्या सर्वांगीण मार्केटिंग संशोधनाचा परिपाक आहेत. यातील आधीपासून असलेला निळा रंग विश्वास, जबाबदारी, निष्ठा आणि शांतता दर्शवतो तर नव्या बरगंडी रंगाच्या समावेशामुळे एक नवीन रूप, आधुनिकता आणि प्रगतीशील दृष्टीकोन दिसून येतो. नवीन लोगोमध्ये एकत्र दिसणारे “अॅक्सिस” आणि “मॅक्स” ब्रँडवरील वाढलेला विश्वास दर्शवतात आणि डबल भरोसा (दुप्पट विश्वास) ही भावना अधोरेखित करतात.
अॅक्सिस मॅक्स लाइफने ‘डबल भरोसा’ ही एकात्मिक जाहिरात आणली असून त्यात ब्रँड अॅम्बेसेडर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा व त्यांच्या पत्नी रितिका सजदे पाहायला मिळणार आहेत. या जाहिरातीत विश्वास आणि विश्वसनीयता हे दुहेरी वचन अधोरेखित करण्यात आले आहे. ग्राहकांना मॅक्स लाइफ आणि अॅक्सिस या जीवनविमा व आर्थिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या ब्रँड्सची एकत्रित शक्ती जास्त विश्वास आणि संरक्षण देण्यास सक्षम आहे यावर ही जाहिरात भर देते.
जाहिरातीची लिंक – https://youtu.be/jTdjohkRzS0
अॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत त्रिपाठी म्हणाले की, “आमची ही नवीन ओळख फक्त ब्रँडच्या नावातला बदल नाही तर जीवन विमा क्षेत्राला एक वेगळे रूप देण्याच्या आमच्या वचनबद्धतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. आमची नवीन ओळख आमच्या सर्व ग्राहकांना अद्वितीय मूल्य देण्याच्या वचनाचे प्रतीक आहे. अॅक्सिस आता आमच्या ओळखीचा अविभाज्य घटक झाली आहे. त्यामुळे नवनवीन संधींचा लाभ घेण्यासाठी आणि वितरण साखळी विस्तारित करून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व डिजिटलदृष्ट्या सक्षम सेवा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. भारतातील पहिल्या तीन क्रमांकांच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक होण्याचा मानस आम्ही एकत्र आल्यामुळे साध्य होईल अशी आम्हाला खात्री वाटते.”
अॅक्सिस मॅक्स लाइफने आर्थिक वर्ष २४ पासून आपल्या धोरणाचा भाग म्हणून टियर २ शहरे आणि इतर ठिकाणी ९० नवीन कार्यालये उघडून आपल्या मालकीची माध्यमे मोठ्या प्रमाणावर वाढवली आहेत. अॅक्सिस मॅक्स लाइफने आपली वितरण साखळीही विस्तारित केली असून आर्थिक वर्ष २४ मध्ये ४१ नवीन भागीदार तर आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या सहामाहीत २० भागीदार सहभागी करून घेतले आहेत. हा विस्तार ब्रँडच्या नवीन ओळखीशी अनुरूप आहे. त्यामुळे कंपनीला नवीन प्रचंड क्षमता असलेल्या बाजारपेठांमध्ये आपली ओळख प्रस्थापित करणे आणि दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने अनेक भागीदार स्वतःशी जोडून घेणे शक्य होईल.
अॅक्सिस बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक आणि अॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे अध्यक्ष राजीव आनंद म्हणाले की, “अॅक्सिस आणि मॅक्स हे दोन ब्रँड्स एकत्र आल्यामुळे आमच्या सामायिक दृष्टीकोनावर आधारित दीर्घकालीन भागीदारीचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. हा बदल फक्त चिन्हात्मक नाही तर भारताच्या विविधांगी आर्थिक सुरक्षा गरजांचे ते प्रतिबिंब आहे. आम्ही देशभरातील लाखो लोकांसाठी उज्ज्वल भवितव्य सुरक्षित करत असताना अधिक चांगल्या समन्वयासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.”


