पुणे –
निवृत्त दूरदर्शन संचालक
श्री चंद्रकांत बर्वे यांनी त्यांच्या आकाशवाणी,दूरदर्शन च्या चाकरीत मोठमोठी व्यक्तिमत्वे जवळून पाहिली. काही व्यक्तिमत्वे दुरून जितकी मोठी वाटत होती,प्रत्यक्षात मात्र लेखकाला त्यांचा वेगळाच अनुभव आला. असे अनुभव लिहिण्याचे धाडस लेखक श्री चंद्रकांत बर्वे यांनी “सत्तरीची सेल्फी” या पुस्तकात केले आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध निवेदक व लेखक श्री सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते ,प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका – समीक्षक आशी नाईक यांच्या उपस्थितीत, निसर्गोपचार आश्रमचे वैद्यकीय संचालक डॉ अभिषेक देविकर यांच्या अध्यक्षतेखाली निसर्गोपचार आश्रम, उरळी कांचन,पुणे येथे सोमवार,दिनांक १६ डिसेंबर २०२४ दुपारी ४.३० वाजता
होत आहे.
या शुभ प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे,अशी विनंती हे पुस्तक प्रकाशित केलेल्या न्यूज स्टोरी टुडे च्या प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांनी केली आहे.
-9869484800


