Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedवैष्णो व्हिजन संस्थेच्या वतीने 19 डिसेंबर रोजी “पन्नाशीतील ग्रंथाली”या विशेष कार्यक्रमाचे आयोजन*

वैष्णो व्हिजन संस्थेच्या वतीने 19 डिसेंबर रोजी “पन्नाशीतील ग्रंथाली”या विशेष कार्यक्रमाचे आयोजन*

*

*ठाणे,दि.17:* मराठी साहित्य विश्वातील लोकप्रिय “ग्रंथाली”या संस्थेला दि.25 डिसेंबर 2024 रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने वैष्णो व्हिजन संस्थेच्या वतीने गुरुवार दि.19 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे (प.) येथे “पन्नाशीतील ग्रंथाली”या विशेष गप्पा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचागकर्ते, खगोलशास्त्र अभ्यासक श्री.दा.कृ. सोमण हे आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस.एम.सी. इन्फ्रास्टक्चर संचालक श्री.सुहास मेहता हे असून विशेष निमंत्रित म्हणून मराठी भाषा विभाग संस्था, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे संचालक डॉ.शामकांत देवरे व ठाणे जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप हे उपस्थित राहणार आहेत.
या गप्पा कार्यक्रमात माजी राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार, संपादक श्री.कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार, संपादक श्री.दिनकर गांगल, ग्रंथालीचे संपादक श्री.अरुण जोशी, ग्रंथाली संस्थेच्या विश्वस्त डॉ.लतिका भानुशाली व डॉ.मृण्मयी भजक यांचा यांचा सहभाग आहे. या कार्यक्रमात मुलाखतकार म्हणून जयु भाटकर हे असणार आहेत. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अस्मिता पांडे करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यातील साहित्यिक अनंत देशमुख, अशोक बागवे, अनुपमा उजगरे, चांगदेव काळे आणि डॉ.निर्मोही फडके या साहित्यिकांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
तरी, या कार्यक्रमासाठी रसिकांनी मराठी ग्रंथसंग्रहालय, पहिला मजला, वा.अ. रेगे सभागृह, स्टेशन रोड, ठाणे (प.) येथे दि.19 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन वैष्णो व्हिजन संस्थेच्या संस्थापक व कार्यकारी निर्माती पद्मा भाटकर यांनी केले आहे.
00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments