पुणे, २३ डिसेंबर २०२४ : कथक लर्निंग अकॅडमी असलेल्या कथक पाठशाला संस्थेच्या वतीने आपल्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच टिळक स्मारक मंदिर येथे नृत्यर्पण हा कथक नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. संस्थेच्या संचालिका नेहा मुथियान व त्यांच्या ८० हून अधिक विद्यार्थीनींनी विविध विलोभनीय कथक नृत्याचे आविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. जेम्बे पर्कशन आणि कथक नृत्याचा एक अनोखा मिलाफ तसेच आंतरिक सौंदर्याचा महत्त्व दर्शविणारे “अस्तित्व” ही एक प्रायोगिक अभिनय नृत्य नाटिका या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.
रसिकांच्या प्रतिसादात रंगला कथक पाठशालाचा नृत्यर्पण कार्यक्रम
RELATED ARTICLES


