चेन्नई, भारत: २४ डिसेंबर २०२४: हर्बलाइफ इंडिया या प्रमुख आरोग्य व वेलनेस कंपनी, समुदाय आणि प्लॅटफॉर्मला अॅक्वाईको उपक्रमाच्या माध्यमातून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्रती त्यांच्या मोठ्या योगदानासाठी आयआयटी मद्रास सीएसआर अवॉर्ड २०२४ सह सन्मानित करण्यात आले. या सन्मानामधून स्केलेबल व शाश्वत सामुदायिक प्रभाव घडवून आणण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्याप्रती हर्बलाइफ इंडियाची कटिबद्धता दिसून येते.
आयआयटी मद्रास सीएसआर समिट ‘विकसित भारत २०४७ – तंत्रज्ञान-सक्षम सीएसआरच्या माध्यमातून सर्वसमावेशक परिवर्तनात्मक प्रभावाला चालना’दरम्यान डॉ. टी. आर. बी. राजा, माननीय उद्योग, गुंतवणूक प्रोत्साहन व वाणिज्य मंत्री, तामिळनाडू सरकार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हर्बलाइफच्या पाठिंब्यासह सेंटर फॉर अॅक्वॉटिक लाइव्हलीहूड्स (जलजीविका)चा उपक्रम अॅक्वाईकोने वापरात नसलेल्या जलीय संस्थांना शाश्वत उदरनिर्वाहामध्ये बदलत जलीय कृषीमध्ये क्रांती घडवून आणली आहे. डिजिटल टूल्स, आयओटी-आधारित वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग आणि एआय-पॉवर्ड चॅटबोट्सची अंमलबजाबवणी करत हा प्रकल्प मत्स्यपालन नियोजन सोपे करतो, मत्स्यपालनासाठी त्वरित पाठिंबा देतो आणि रिअल-टाइम वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंगची खात्री देतो.
प्रधान मंत्री मत्स्य किसान समृद्धी सह-योजना (पीएम-एमकेएसएसवाय) अशा सरकारी योजनांशी संलग्न राहत अॅक्वाईको पुर्निया (बिहार), टिकमगड (बुंदेलखंड), रत्नागिरी (कोकण) आणि कारवार (कर्नाटक) अशा प्रांतांमध्ये कार्यरत आहे. या उपक्रमाने प्रत्यक्ष १०,००० शेतकऱ्यांना सक्षम केले आहे, ज्यापैकी २,५०० महिला शेतकरी आहेत, तसेच हा उपक्रम तंत्रज्ञान संचालित व समुदाय-केंद्रित कृषीसंस्कृती सिस्टम्सच्या माध्यमातून पन्नासहून अधिक महिला बचतगट (एसएचजी) आणि दहा मत्स्यपालन सहकारी संस्थांशी संलग्न झाला आहे.
हर्बलाइफ इंडियाच्या स्ट्रॅटेजी अॅण्ड इम्प्लीमेंटेशनचे उपाध्यक्ष उदय प्रकाश म्हणाले, ”आम्हाला आयआयटी मद्रास सीएसआर अवॉर्ड २०२४ मिळाल्याने अत्यंत सन्माननीय वाटत आहे. हर्बलाइफ इंडियामध्ये आमचे सीएसआर उपक्रम आम्हाला आमच्या उपक्रमांमध्ये तंत्रज्ञान सुधारणांना विनासायासपणे एकीकृत करत मोठ्या प्रमाणात शाश्वत प्रभावांना चालना देण्यास अग्रस्थानी ठेवतात. या दृष्टिकोनाने उत्तम निष्पत्ती देण्यासोबत उदरनिर्वाहामध्ये वाढ केली आहे आणि अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे.”
ते पुढे म्हणाले, ”आयआयटी मद्रासने नुकतेच केलेल्या सन्मानामधून प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी करण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ होते, जे देशभरातील समुदायांना सक्षम करतात. आम्ही सकारात्मक प्रभाव घडवून आणण्यासाठी आमची सीएसआर अंमलबजावणी सहयोगी सेंटर फॉर अॅक्वॉटिक लाइव्हलीहूड जलजीविकाचे देखील आभार व्यक्त करतो.”
हर्बलाइफ इंडिया अनेक सीएसआर उपक्रमांमध्ये सक्रियपणे सामील आहे, ज्यांचा पोषणासंदर्भात जनजागृती वाढवण्याचा, शिक्षणाला चालना देण्याचा आणि वंचित समुदायांना सक्षम करण्याचा मनसुबा आहे. कंपनीच्या फोकस क्षेत्रांमध्ये उपक्रमांचा समावेश आहे, जे आरोग्य व वेलनेसला चालना देतात, आर्थिक विकास व स्थिरतेसाठी निष्पक्ष व समान संधी निर्माण करत व्यक्तींना सक्षम करतात आणि विद्यमान व भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे संरक्षण व जतन करतात.


