Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीओजीएस तर्फे 33 वी दोन दिवसीय वार्षिक परिषद संपन्न * पर्ल्स ॲन्ड...

पीओजीएस तर्फे 33 वी दोन दिवसीय वार्षिक परिषद संपन्न * पर्ल्स ॲन्ड पिटफॉल्स इन एंडोस्कोपी ॲन्ड एआरटी, एंडोएआरटी विषयावरील 6 वी आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

पुणे, 24 डिसेंबर 2023 : पुणे ऑब्स्टेट्रिक ॲन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटी (पीओजीएस) तर्फे हॉटेल शेरटन ग्रँड येथे 33 वी वार्षिक परिषद आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक्स ॲन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटीजच्या (एएमओजीएस) विविध समितींच्या सहकार्याने पर्ल्स ॲन्ड पिटफॉल्स इन एंडोस्कोपी ॲन्ड एआरटी (एंडोएआरटी) ६वी आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. या दोन दिवसीय परिषदेत प्रमुख बीजभाषण,सादरीकरणे,कार्यशाळा,शोधनिबंध,पोस्टर स्पर्धा,चर्चासत्रे आणि राष्ट्रीय स्तरावरील तज्ञांद्वारे चर्चा इत्यादी उपक्रम पार पडले. या परिषदेत एंडोस्कोपिक शस्त्रक्रियेतील प्रगतीमुळे संशोधन आणि संवादाच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत व या परिषदेत यावर विचारमंथन करण्यात आले.

या परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रसिध्द नाट्य व चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉ.जब्बार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून फॉग्सीच्या प्रेसिडेंट इलेक्ट डॉ.सुनिता तांदुळवाडकर व असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक्स ॲन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटीजचे अध्यक्ष डॉ.किरण कुर्तकोटी हे उपस्थित होते. पीओजीएसच्या अध्यक्ष डॉ.आरती निमकर, मानद सचिव डॉ.मीनाक्षी देशपांडे, पीओजीएसच्या माजी अध्यक्ष व एंडोएआरटी 2024 च्या समन्वयक डॉ.मीनू अगरवाल आणि पीओजीएसचे वैद्यकीय सचिव व एंडोएआरटी 2024 चे समन्वयक डॉ.अमोल लुंकड आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या कॉलेजमधील दिवसांना उजाळा देत नाट्य व चित्रपट दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल म्हणाले की, बी.जे.मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमुळे मी माणसुकी शिकलो.त्यामुळे चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील माझ्या सर्व अनुभवांसाठी विशेषत: मानवी भावनांसाठी मी माझे शिक्षक, माझे महाविद्यालय आणि ससून हॉस्पिटल यांचा मी ऋणी आहे. महिलांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सुलभ करणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानावर विचारमंथन करणाऱ्या या परिषदेचा भाग होताना मला अत्यंत आनंद होत आहे.

पीओजीएसच्या अध्यक्ष डॉ.आरती निमकर म्हणाल्या की, या ३३ व्या वार्षिक परिषदेच्या माध्यमातून विविध वैज्ञानिक सत्रे आणि कार्यशाळांच्या माध्यमातून सदस्यांना आधुनिक तंत्रे व ज्ञानाने समृध्द करण्याचा आमचा प्रयत्न आहे.ही परिषद वैद्यकीय कौशल्य प्रदान करण्यासाठी आणि समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एक व्यासपीठ आहे.

फॉग्सीच्या प्रेसिडेंट इलेक्ट डॉ.सुनिता तांदुळवाडकर म्हणाल्या की, प्रसूती व स्त्रीरोग शास्त्राच्या माध्यमातून आपण महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.पीओजीएस व फॉग्सी संस्थांच्या माध्यमातून युवा पिढीपर्यंत पोहचून व त्यांना या संस्थांमध्ये समाविष्ट करून आणखी व्यापक स्तरावर सेवा करण्याचा प्रयत्न करू.

असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक्स ॲन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटीजचे (एएमओजीएस) अध्यक्ष डॉ.किरण कुर्तकोटी म्हणाले की, पूर्वीच्या काळात स्त्रीरोगशास्त्र क्षेत्रात कोणत्याही प्रकारची सुपर स्पेशालिटी उपलब्ध नव्हती. आज मात्र या क्षेत्रात आव्हीएफ,फीटल मेडिसिन आणि कॉस्मेटिक गायनॅकोलॉजी सारखी ३-४ क्षेत्रे उदयास आली आहेत.

पीओजीएसच्या माजी अध्यक्ष व एंडोएआरटी 2024 च्या समन्वयक डॉ.मीनू अगरवाल म्हणाल्या की, एंडोएआरटी सारख्या विशिष्ट विषयावर वार्षिक परिषद आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.या परिषदेत इमेजिंग सायन्स, कॉस्मेटिक गायनेकालॉजी,हिस्टेरेस्कोपी, लॅप्रोस्कोपी, कॉम्बिनेशन इंडक्शन आणि सेल्फ डिफेन्स टेक्निक्स आदी विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या.

या दोन दिवसीय परिषदेत आयव्हीएफ केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया,एम्ब्रीयोलॉजी लॅब : मान्यता व प्रमाणपत्र,डिकोडिंग मायोक्टोमी,एंडोस्कोपीमधील उपकरणे,एआरटी कायदे,एंडोमेट्रिऑसिस शस्त्रक्रिया व्यवस्थापन अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. परिषदेत वैद्यकीय महाविद्यालयांसाठी पेपर आणि पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

वार्षिक पुरस्कार हे या परिषदेचे एक वैशिष्ट्य होते. आपल्या निःस्वार्थ समर्पणाबद्दल आणि समाजासाठी अनेक वर्षांच्या अतुलनीय योगदानाबद्दल वरिष्ठ डॉ. दिलीप कामत यांना पीओजीएस जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. मुंबई मधील डॉ. प्रशांत मंगेशीकर आणि हैदराबाद येथील डॉ. ममता दीनदयाल यांना एंडोएआरटी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ.आशिष काळे,डॉ.अमोल लुंकड,डॉ.मीनाक्षी देशपांडे,डॉ. उमा वानखेडे, डॉ.कांचन दुरुगकर आणि डॉ.मंगला वाणी यांच्यासह विविध डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

तसेच याप्रसंगी पीओजीएसच्या स्पेक्युलम नियतकालिक वृत्तपत्राचे देखील प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेत ३१ हून अधिक शोध निबंध आणि पोस्टर्सवर चर्चा करण्यात आली आणि त्यावर विचारमंथन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments