Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती...

पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी..

दिनांक २५ डिसेंबर २०२४ भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे उत्तम लेखक, कवी तर होतेच शिवाय ते मुत्सद्दी राजकारणी आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व लाभलेले महान देशभक्तही होते असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी

महासंघाचे सनी कदम आणि महापालिकेचे विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments