राष्ट्रीय, २५ डिसेंबर, २०२४: इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडचा आयपीओ मंगळवार, ३१ डिसेंबर २०२४ रोजी खुला होणार आहे. यामध्ये प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले १,२१,००,००० इक्विटी शेयर्स असणार आहेत. अँकर गुंतवणूकदारांना बोली/ऑफर खुली होण्याच्या एक कामकाजाचा दिवस आधी म्हणजे सोमवार, ३० डिसेंबर २०२४ रोजी बोली लावता येईल. बोली/ऑफर गुरुवार, २ जानेवारी २०२५ रोजी बंद होईल.
या ऑफरसाठी प्राईस बँड दर इक्विटी शेयरसाठी २०४ रुपये ते २१५ रुपये निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी ६९ रुपयांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असतील तर ६९ च्या पटीत बोली लावावी लागेल.
या आयपीओमध्ये ८६००००० पर्यंत नव्याने जारी केलेले इक्विटी शेयर्स आहेत आणि समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर रणबीर सिंग खडवलिया यांनी ३५,००,००० पर्यंत इक्विटी शेयर्स विक्रीसाठी प्रस्तुत केले आहेत.
या कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.
या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर आर्यमन फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड हे आहेत.


