*
पुणे, दि. ११ : पेरणे (ता. हवेली) पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी १ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय येत असतो. याठिकाणी येणाऱ्या वाहनांकरिता तात्पुरत्या स्वरुपात वाहनतळ उभारण्यासाठी तसेच अन्य बाबीसाठी खासगी मालकीच्या मोकळ्या मिळकती तात्पुरत्या स्वरुपात २७ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ पर्यंत अधिग्रहित करण्यात आल्याचे आदेश प्रा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत.
विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय खासगी वाहनाने तसेच सार्वजनिक वाहनाने येत असतो. विजयस्तंभाजवळ मोठी गर्दी होऊ नये यासाठी लोणीकंद, पेरणे परिसरात थांबवून पार्किंग करावी लागतात. त्यामुळे पार्किंगच्या जागा लवकर अधिग्रहण होऊन तेथे स्वच्छता करणे गरजेचे ठरते. त्या अनुषंगाने प्र. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ६५ अन्वये खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार पेरणे येथील गट क्र. १०५२ मधील ०. २१ हे. आर पैकी ०.१० हे. आर क्षेत्र शौच खड्ड्याकरिता, गट क्र. ९३२ मधील २.११ हे. आर मधील मोगळी जागा अधिग्रहित करण्यात येणार आहे. पेरणे येथील गट क्र. ९३०/२ मधील ५.३६ हे. आर मधील मोकळी जागा व ९३२, ९३०/२ मध्ये मंगल कार्यालय येथील रिकामी जागा पोलीस प्रशासनास पार्किंगसाठी, वढू खूर्द येथील गट क्र. १७३ मधील ७.८१ हे. आर क्षेत्रामधील तसेच गट क्र. १७४/१ मधील २.३४ हे. आर क्षेत्रामधील जागा मुंबई व नाशिक बाजूकडून येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांसाठी पार्किंग म्हणून वापरण्यात येणार आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000


