नवी दिल्ली, २ जानेवारी २०२५: अॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स लि. या पूर्वाश्रमीच्या मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. (“अॅक्सिस मॅक्स लाइफ”/ “कंपनी”) ने अॅक्सिस मॅक्स लाइफ सस्टेनेबल वेल्थ ५० इंडेक्स फंडच्या अनावरणाची घोषणा केली आहे. अॅक्सिस मॅक्स लाइफने विकसित केलेल्या स्वतःच्या सस्टेनेबल यील्ड इंडेक्सवर आधारित राहून सातत्यपूर्ण रोख प्रवाह देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा हा पहिलावहिला फंड आहे. या कस्टमाइज्ड इंडेक्सचे गणन आणि देखभाल एनएसई इंडायसेस लिमिटेडकडून केले जाईल.
फंडची वैशिष्टे:
• फंडचा हेतू: अॅक्सिस मॅक्स लाइफ सस्टेनेबल वेल्थ ५० इंडेक्स फंडकडून आपल्या मालकीच्या समान भारित फॅक्टरवर आधारित गणनात्मक इंडेक्सवर आधारित राहून ५० सर्वाधिक कामगिरी करणाऱ्या समभागांमध्ये गुंतवणूक केली जाते. बिगर वित्तीय कंपन्यांसाठी फ्री कॅश फ्लो यील्ड (एफसीएफ यील्ड)वर आणि वित्तीय कंपन्यांसाठी डिव्हिडंड यील्डवर आधारित कंपन्यांवर निफ्टी ५०० युनिव्हर्समधील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या शेअर्सचा शोध घेण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे.
• मालमत्ता वितरण:
o समभाग: ८० – १००%
o रोख आणि मनी मार्केट साधनेः ०–२०%
अॅक्सिस मॅक्स लाइफचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी सचिन बजाज म्हणाले की, “अॅक्सिस मॅक्स लाइफ सस्टेनेबल वेल्थ ५० इंडेक्स फंडच्या अनावरणामुळे बाजारातील बदलती स्थिती आणि गुंतवणूकदारांचे प्राधान्यक्रम यांच्यावर उपाय काढणारे मूल्यवर्धित गुंतवणूक पर्याय देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हा फंड आमच्या पोर्टफोलिओमध्ये एक मौल्यवान भर ठरेल आणि भारताच्या आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक म्हणून आपले स्थान मजबूत करेल अशी आम्हाला खात्री वाटते.”
विमा उद्योगातील पहिला मालकीचा इंडेक्स फंड म्हणून अॅक्सिस मॅक्स लाइफ सस्टेनेबल वेल्थ ५० इंडेक्स फंडमधून ग्राहकाला गणनात्मक, फॅक्टरवर आधारित इंडेक्स मिळतो आणि तो ग्राहकाच्या शाश्वत आणि मूल्याधारित गुंतवणुकीची मागणी पूर्ण करतो. उत्तम रोख प्रवाह आणि सातत्यपूर्ण वाढीच्या क्षमता असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करून हा फंड स्थैर्य तसेच कामगिरीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतो. हा फंड सध्या अॅक्सिस मॅक्स लाइफच्या ऑनलाइन युलिप उत्पादनांद्वारे उपलब्ध असेल. त्यात ऑनलाइन सेव्हिंग प्लॅन आणि फ्लेक्सी वेल्थ अॅडव्हांटेज प्लॅन यांचा समावेश आहे आणि तो अनावरणानंतर अतिरिक्त उत्पादनांमध्येही विस्तारित होईल.
एनएसई इंडायसेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश अग्रवाल म्हणाले की, “आम्ही अॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स पद्धतीद्वारे या कस्टमाइज्ड इंडेक्सच्या निर्मितीसाठी अॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्ससोबत काम केले आहे. कस्टमाइज्ड इंडेक्सचे गणन आणि देखरेख एनएसई इंडायसेस लिमिटेडकडून केली जाईल.”
अॅक्सिस मॅक्स लाइफने स्वतःला ऑनलाइन बचत वर्गात बाजारातील आघाडीची कंपनी म्हणून प्रस्थापित केले आहे आणि आपल्या ‘निफ्टी स्मॉलकॅप क्वालिटी इंडेक्स फंड’, ‘मिडकॅप मोमेंटम इंडेक्स फंड’ आणि ‘निफ्टी अल्फा ५० फंड’ सारख्या पॅसिव्ह इंडेक्स फंड्सद्वारे मोठे यश मिळवले आहे.


