सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथे सोमवारपासून (दि. ६) तीन दिवस प्राजक्ता व्याख्यानमाला होत आहे.
सुपे परगणा ग्रामस्थ व दानशूरांच्या सहकार्याने जीवन साधना फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने प्राजक्ता मतिमंद विद्यालयाच्या आवारात विद्यालयाचे प्रेरणास्थान प्राजक्ता दिदी स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे यंदाचे अकरावे वर्ष आहे.
सोमवारी (दि.६) श्री राहुल शिंदे (गुरुजी) चापडगावकर यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची तरुणाई’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. मंगळवारी (दि.७) श्री. बाबासाहेब खराडे, पुणे यांचे ‘हसण्यासाठी जन्म आपुला’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवार (दि.८) श्री. रणजीत ताम्हाणे (सर) बारामती यांचे ‘Unlok Your Potential-तुमच्या मनाची शक्ती उघडा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानाची वेळ रात्री आठ असून, या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा.तसेच, गुरुवारी २३ जानेवारी २०२५ रोजी हिंदवी स्वराज्याचे संकल्पक श्रीशहाजीराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी १०.०० वाजता श्री सुरेंद्र निकम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांचे ‘सुरक्षित वाहतूक व अपघात टाळण्यासाठी..’या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.०० वाजता इंटरनॅशनल जादूगार श्री शिवम सर यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत. तसेच, रात्री आठ वाजता सातारा येथील विक्रम कदम, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व इतिहास अभ्यासक यांचे ‘स्वराज्यसंकल्पक श्री शहाजीराजे भोसले’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश चांदगुडे व सचिव डॉ. श्रीप्रसाद वाबळे यांनी केले आहे.
——————-
सुप्यात सहा जानेवारीपासून प्राजक्ता व्याख्यानमाला
RELATED ARTICLES


