Tuesday, September 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोथरूड मधील मृत्युंजय मंदिराशेजारील नाला बुजविला जाण्याची भीती... त्वरित कार्यवाही करावी. ...

कोथरूड मधील मृत्युंजय मंदिराशेजारील नाला बुजविला जाण्याची भीती… त्वरित कार्यवाही करावी. पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांना संदीप खर्डेकर यांचे निवेदन

पुणे -कोथरुड येथील मृत्युंजय मंदिरा शेजारील नाल्याबाभत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले आहे.मंदीराशेजारील नाला बुजविण्याचे प्रयत्न होत आहेत, त्याबाबत त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे

काही नागरिकांच्या तक्रारी वरून आज सकाळी कोथरूड च्या मृत्युंजय मंदिराशेजारील नाल्याची पाहणी केली असता अनेक गोष्टी निदर्शनास आल्या.
मुळात संपूर्ण नाला हिरवं गार्डन नेट लावून बंद केल्यामुळे आत काय चाललंय हेच कळत नाही. आज आत जाऊन बघितलं असता चित्र भयावह असल्याचे निदर्शनास आले.
याबाबतीत देवदेवेश्वर संस्थान चे विश्वस्त रमेश भागवत यांची भेट घेतली असता ” सदर नाला आमच्या वहीवाटीचा असून आम्ही देखील तेथे चाललेल्या घडामोडी बाबत प्रशासनास पत्र लिहिलं आहे असं त्यांनी सांगितले “.
त्यांच्या पत्रावर प्रशासनाने काय कारवाई केली हे स्पष्ट करावे. तसेच त्वरित ह्या ठिकाणी पथक पाठवून नेमके काय चालले आहे त्याचा अहवाल जाहीर करावा.
येथे चाललेल्या बांधकामामुळं नाला बुजण्याची भीती व्यक्त होतं असून त्यामुळे पूर आल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल असे स्पष्टपणे नमूद करत आहे असेही या निवेदनात म्हटले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments