Tuesday, September 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedशाश्वत बांधकामावरील पहिली आंतरराष्ट्रीय कार्यशाळा बीएनसीएमध्ये संपन्न

शाश्वत बांधकामावरील पहिली आंतरराष्ट्रीय कार्यशाळा बीएनसीएमध्ये संपन्न

पुणे, दि. ७ जानेवारी २०२५ : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालय आणि इंग्लंड-भारत शिक्षण आणि संशोधनातील पुढाकारातून (यूकेआयईआरआय) महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए), मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटीबी) आणि इंग्लंडमधील लिव्हरपूल जॉन मूरस विद्यापीठ यांच्या समन्वयातून बीएनसीएमध्ये नुकतीच शाश्वत बांधकामावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळा पार पडली. भारतीय पातळीवरील ही पहिली कार्यशाळा केपेबल (कपॅसिटी बिल्डींग इन बिल्ट एनव्हायरमेंट सस्टेनेबिलीटी रिसर्च उर्फ सीएपीएबीएलई) प्रकल्पांतर्गत असून त्यामध्ये भारत आणि इंग्लंडमधील मिळून 14 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले.

19 ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित केलेल्या या कार्यशाळेच्या आयोजनाचे नेतृत्व भारतातील प्रकल्प मार्गदर्शक व आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापक डॉ. बकूल राव, भारत प्रकल्प सहमार्गदर्शक आणि बीएनसीएतील सहयोगी प्राध्यापक डॉ. वैशाली अनगळ, इंग्लंडच्या प्रकल्प मार्गदर्शक आणि लिव्हरपूर जॉन मूरस विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ.अनुपा मनेवा आणि इंग्लंडच्या सहमार्गदर्शक व लिव्हरपूर जॉन मूरस विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मोहन श्रीवर्धेना यांनी केले. त्यांनी कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना व्यापक शैक्षणिक तसेच व्यवहार्य पातळीवरील मार्गदर्शन केले.

बीएनसीएतील पर्यावरणीय वास्तूरचनाशास्त्र आणि नियोजन विभागप्रमूख प्राध्यापक डॉ.सुजाता कर्वे तसेच डॉ.अमृता गरूड यांनी अनुक्रमे या कार्यशाळेमध्ये पुणे-मुंबईतील विविध ठिकाणांना व वारसा स्थळांना भेटी आणि कार्यशाळेचे भारतीय पातळीवरील व्यवस्थापन केले. भेटी दिलेल्या ठिकाणांमध्ये हरीत बांधकामांची अंमलबजावणी करणाऱ्या इमारती, तसेच पर्यावरणीय वास्तूरचनाशास्त्राच्या दृष्टिने पूरक बांधकामांना दिली जाणारी मानांकने आणि शाश्वत बांधकामांच्या प्रमाणपत्रे देण्याच्या कामाची माहिती देण्यात आली.

बीएनसीएतील या कार्यशाळेत बांधकामातील बांबूच्या वापरातील शाश्वत तंत्रांचे ज्ञान व कार्यानुभवाचे मार्गदर्शन बांबू वापरातील तज्ज्ञ आर्किटेक्ट सायली अंधारे यांनी केले. आयआयटीबीमधील हरित बांधकामातील अभियांत्रिकी तज्ज्ञ डॉ. योगेंद्र शास्त्री आणि पर्यावरणीय व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ.अजय देशपांडे यांनीही या कार्यशाळेत शाश्वत बांधकाम कार्यपद्धतीसंबंधी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना जुन्या पुण्यातील वारसा स्थळांना व मुंबईतील फोर्ट विभागाला भेटी दिल्या.

बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांनी कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना सदिच्छा देताना म्हणाले की, या प्रकल्पात भर देण्यात येणाऱ्या चक्रीय अर्थकारणातून बांधकाम क्षेत्रातील शाश्वत उद्दीष्टांपर्यंत पोचायला नक्कीच हातभार लाभेल.

डॉ. वैशाली अनगळ म्हणाल्या की, दोन वर्षांच्या या अभ्यासप्रकल्पातून भारत आणि इंग्लंडमध्याल सहभागी झालेल्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये संशोधनक्षमता वाढण्यास मदत होईल. शिवाय यातून अप्रत्यक्षपणे या दोन्ही देशांमधील विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक व ज्ञानातील देवाण-घेवाणीबरोबरच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मार्गदर्शकांबरोबर थेट संवाद साधता येतो आहे.
डॉ. मोहन श्रीवर्धेना म्हणाले की, यातून आम्ही चक्रीय अर्थकारणाचा शाश्वत बांधकामाशी असणाऱ्या संबंधातून विविध संशोधन प्रकल्पनांना चालना देणार आहोत. या अभ्यासक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात हरीत तंत्रज्ञानावर आधारित या अभ्यासक्रमचा वापर यांच्या कारकिर्दीतील पुढील वाटचालीसाठी करून घेता येईल.देशाच्या सीमेपलीकडे जाऊन ही अपूर्व संधी आम्हाला शिक्षणापलीकडील महत्वाची व्यवहार्य बाजूही समजून घेण्यासाठी उपयोगी ठरली, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया कार्यशाळेत सहभागी झालेल्या इंग्लंडच्या एका विद्यार्थ्याने दिली.

भारतातील प्रशिक्षण कार्यशाळेनंतर इंग्लंडमध्येही येत्या जून 2025 मध्ये अशीच आणखी एक कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. त्याचा परीपाक म्हणून ‌‘केपेबल ’ तर्फे या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी केलेल्या संशोधन निबंधांचे सादरीकरण आणि ग्रंथरुपात दस्तावेजीकरण जानेवारी 2026 मध्ये आयआयटीबीमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेतून होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments