Tuesday, September 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक पातळीवरील वैद्यकीय शिक्षणात एकसंध मान्यतेची गरज कॅडविन पिल्लई, ट्रान्सवर्ल्ड एज्युकेअरचे व्यवस्थापकीय...

जागतिक पातळीवरील वैद्यकीय शिक्षणात एकसंध मान्यतेची गरज कॅडविन पिल्लई, ट्रान्सवर्ल्ड एज्युकेअरचे व्यवस्थापकीय संचालक आणि किंग्स इंटरनॅशनल मेडिकल अकादमीचे अध्यक्ष

जसजसे लोकसंख्येचे वय वाढत आहे, तसतसे आरोग्य सेवा प्रणालीचा वापर करण्याचे प्रमाण वाढते, जागतिक पातळीवरील आरोग्य समस्यांबाबतची जाण वाढत आहे आणि आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळही या मागणीनुसार बदलत आहे. परिणामी, आज जगभरातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या तीन-चार दशकांपूर्वीच्या तुलनेने दुप्पट झाली आहे. भारतात सध्या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 650 पेक्षा जास्त आहे, आणि दरवर्षी सुमारे 1,00,000 पदवीधर तयार होत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात वेगाने होणाऱ्या या विस्तारामुळे दर्जा कायम ठेवण्यासाठी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या करिअर प्रगतीसाठी मान्यता प्रणाली एकसंध करण्याची आवश्यकता अधोरेखित होते.
जागतिक पातळीवर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढ
लोकसंख्येतील बदल आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे जागतिक पातळीवर प्रशिक्षित व सुशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता सतत वाढत आहे. परिणामी, वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार, सध्या जगभरात 3,000 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये आहेत. दरवर्षी 4,00,000 पेक्षा जास्त नवे प्रशिक्षित वैद्यकीय डॉक्टर तयार होतात. वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता, जागतिक पातळीवर आरोग्यसेवांची वाढती मागणी दिसून येते.
ट्रान्सवर्ल्ड एज्युकेअरचे व्यवस्थापकीय संचालक आणि किंग्स इंटरनॅशनल मेडिकल अकादमीचे अध्यक्ष कॅडविन पिल्लई सांगतात कि, “अलीकडच्या काळात भारत, चीन आणि अमेरिका या देशांमध्ये प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षणाच्या विकास झाला आहे. केवळ भारतातच 650 पेक्षा जास्त वैद्यकीय महाविद्यालये असून, दरवर्षी 1,00,000 हून अधिक एमबीबीएस पदवीधर तयार होतात. देशातील लोकसंख्या वाढीमुळे अधिक आरोग्य सेवा पुरवठादारांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच ही वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, चीनमध्येही वैद्यकीय शिक्षण संस्थांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सध्या चीनमध्ये197 वैद्यकीय संस्था आहेत ज्या पदवी प्रदान करतात आणि दरवर्षी 2,00,000 हून अधिक पदवीधर तयार करतात.”

क्रॉस बॉर्डर वैद्यकीय शिक्षणापुढील आव्हाने:-

गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या वाढीमुळे वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर विपरित परिणाम होतो. अनेक महाविद्यालये उच्च दर्जाचे शिक्षण देत असल्याचा दावा करतात, परंतु विद्यापीठांच्या अध्यापनाच्या मानकांमधील तफावत आणि परिणामी प्रशिक्षण व आरोग्यसेवेच्या गुणवत्तेमुळे ही समस्या अधिक गंभीर बनते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशांतील वैद्यकीय विद्यार्थ्यांचा दर्जा यामुळे सामान्यतः खालावलेला असतो. पदवी प्राप्त करण्याची इच्छा असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळणे शक्य नसते. यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो आणि परिणामी सर्व आरोग्यसेवा प्रणालींची कार्यक्षमता प्रभावित होऊ शकते.
या समस्येचे निराकरण करण्याकरिता वैद्यकीय महाविद्यालयांसाठी एकसंध मान्यता मानकांची गरज आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रशिक्षणात स्वीकारार्ह मानके पूर्ण करणे आणि तयार होणाऱ्या डॉक्टरांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याची क्षमता असणे याची तपासणी करण्यामध्ये मान्यतादात्या संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे.

एकसंध मान्यता मानकांची मागणी:-
मान्यता ही वैद्यकीय शिक्षणातील एक महत्त्वपूर्ण हमी यंत्रणा आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी सार्वत्रिक मान्यता नसल्यास महाविद्यालयांची कार्यक्षमता किंवा त्या महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या पदवीधरांची विविध आरोग्य संघटनांमध्ये काम करण्याची तयारी यांचा दर्जा निश्चित होत नाही. जागतिक वैद्यकीय शिक्षण महासंघ (WFME) आणि लायझन कमिटी ऑन मेडिकल एज्युकेशन (LCME) या दोन संस्था आंतरराष्ट्रीय मान्यतेच्या विकासात आघाडीवर आहेत. या संस्था वैद्यकीय प्रशिक्षणासाठी अधिक सुसंगत आणि जागतिक स्तरावर संघटित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून विद्यार्थ्यांनी कोणत्याही महाविद्यालयातून पदवी घेतली असली तरी ते सक्षम आणि नैतिक डॉक्टर म्हणून तयार होतील.
अनेक नवे वैद्यकीय पदवीधर परदेशात प्रॅक्टिस करू इच्छित असल्याने, त्यांना निवडलेल्या देशाच्या मान्यता आवश्यकता पूर्ण कराव्या लागतात. उदाहरणार्थ, भारत किंवा फिलीपिन्समधील वैद्यकीय पदवीधरांना अमेरिकेत प्रॅक्टिस करण्यासाठी युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसेंसिंग परीक्षांसारख्या (USMLE) परीक्षा द्याव्या लागतात, ज्यातून त्यांची गुणवत्ता सिद्ध होते. एकसंध मान्यता प्रणाली अस्तित्वात असती, तर पदवीधरांना एका देशातून दुसऱ्या देशात अतिरिक्त अडथळ्यांशिवाय जाणे सोपे झाले असते.तसेच, सध्याच्या आणि भविष्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या वाढत्या संख्येमुळे आधुनिक आरोग्यसेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कॅरिबियनमधील वैद्यकीय महाविद्यालये अमेरिका आणि कॅनडातील विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहेत. फक्त कॅरिबियनमध्येच 50 पेक्षा जास्त वैद्यकीय महाविद्यालये आहेत, जिथे दरवर्षी हजारो डॉक्टर तयार होतात, असा दावा अमेरिकन मेडिकल कॉलेजेस असोसिएशनने (AAMC) ने केला आहे.

दर्जा नियंत्रण आणि मानकांची हमी:-
जगभरातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या वाढत्या संख्येमुळे ज्ञानाची गुणवत्ता कमी होत नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), वैद्यकीय शिक्षणातील गुणवत्ता नियंत्रणात शैक्षणिक अनुभव, क्लिनिकल प्रॅक्टिसेस, उपकरणे, संसाधने आणि पुराव्यावर आधारित पद्धती यांचा समावेश होतो. यासाठीच WFME आणि LCME सारख्या मान्यता देणाऱ्या संस्था आहेत, ज्या या सर्व मानकांचे पालन होत आहे की नाही, याची खात्री करतात.
अमेरिका, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांनी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी उच्च मानके असलेल्या स्वतंत्र मान्यता संस्थांचा विकास केला आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी सातत्यपूर्ण मानकं प्रदान करणाऱ्या संस्थांमध्ये अमेरिका येथील अॅक्रिडिटेशन कौन्सिल फॉर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन (ACGME) आणि युनायटेड किंगडममधील जनरल मेडिकल कौन्सिल (GMC) यांचा समावेश आहे. लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणारी वैद्यकीय महाविद्यालये गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा प्रदान करण्यास सक्षम आहेत, हे या संस्था सुनिश्चित करतात.
तात्पर्य :-
नवीन आणि परदेशी वैद्यकीय महाविद्यालयांच्या लक्षणीय वाढीतून आरोग्यसेवा व्यावसायिकांची वाढती गरज दिसून येते, परंतु याचसोबत शिक्षणाच्या दर्जा आणि मानकांसंदर्भातील मुद्देही समोर येतात. यासाठी मान्यता निकषांचे एकसंधीकरण आवश्यक आहे, जेणेकरून वैद्यकीय पदवीधर सीमा ओलांडूनही प्रभावी आणि कार्यक्षम आरोग्यसेवा देण्यासाठी सक्षम असतील. जगभरातील विविध प्रकारच्या लोकसंख्येच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या कौशल्यपूर्ण, व्यावसायिकदृष्ट्या सक्षम आणि नैतिकदृष्ट्या प्रामाणिक डॉक्टर घडवण्याच्या क्षमतेवर वैद्यकीय शिक्षणाचे भवितव्य अवलंबून असेल.

================================================

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments