Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून भारतात आगामी गॅलक्‍सी एस सिरीजसाठी प्री-रिझर्व्‍हचा शुभारंभ

सॅमसंगकडून भारतात आगामी गॅलक्‍सी एस सिरीजसाठी प्री-रिझर्व्‍हचा शुभारंभ

गुरूग्राम, भारत – जानेवारी 13, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज घोषणा केली की, ग्राहक आजपासून त्‍यांचे आगामी गॅलॅक्‍सी एस सिरीज स्‍मार्टफोन प्री-रिझर्व्‍ह करू शकतात. नवीन गॅलॅक्‍सी एस सिरीज मोबाइल एआयमधील नवीन चॅप्‍टरचे अनावरण करेल, ज्‍यामधून प्रीमियम गॅलॅक्‍सी इनोव्‍हेशन्‍स सादर केले जातील, जे तुमच्‍या जीवनातील प्रत्‍येक क्षणामध्‍ये विनासायास सोयीसुविधा देतील.

ग्राहक Samsung.com, सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्स आणि भारतभरातील आघाडीच्‍या ऑनलाइन व ऑफलाइन रिटेल स्‍टोअर्समध्‍ये २००० रूपये टोकन रक्‍कम भरत फ्लॅगशिप गॅलॅक्‍सी एस सिरीज प्री-रिझर्व्‍ह करू शकतात. प्री-रिझर्व्‍ह करणारे ग्राहक अर्ली अॅक्‍सेससाठी पात्र ठरतील आणि नवीन गॅलॅक्‍सी एस सिरीज डिवाईसेसच्‍या खरेदीवर जवळपास ५००० रूपयांचे फायदे मिळवू शकतील.

सॅमसंग गॅलॅक्‍सी एआयच्‍या आगामी उत्क्रांतीला आणेल, ज्‍यामुळे ग्राहक दररोज जगभरातील व्‍यक्‍तींसोबत करणाऱ्या संवादाच्‍या पद्धतीमध्‍ये बदल घडून येईल. नवीन गॅलॅक्‍सी एस सिरीज पुन्‍हा एकदा मोबाइल एआय अनुभवांसाठी स्‍तर उंचावेल. सॅमसंग सॅन जोन, कॅलिफोर्निया येथे २२ जानेवारी रोजी गॅलॅक्‍सी अनपॅक्‍डमध्‍ये गॅलॅक्‍सी एस सिरीजच्‍या नेक्‍स्‍ट जनरेशनचे अनावरण करेल.

लिंक: https://www.samsung.com/in/unpacked/

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments