विद्या वायर्स लिमिटेड ही विविध महत्त्वाच्या उद्योगांसाठी आणि उपकरणांसाठी वायंडिंग व कंडक्टिव्हिटी उत्पादनांची एक प्रमुख निर्माता कंपनी आहे. कंपनीने प्राथमिक समभाग विक्रीसाठी (IPO) ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स (DRHP) भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड (SEBI कडे सादर केला आहे.
सार्वजनिक प्रस्तावामध्ये कंपनीकडून ₹320 कोटींच्या एकूण रकमेच्या नवीन इक्विटी समभागांचे वितरण (Fresh Issue) करण्यात येणार आहे, तसेच प्रमोटर विक्री समभागधारकांकडून (Promoter Selling Shareholders) 10,000,000 इक्विटी समभाग विक्रीसाठी (Offer for Sale – OFS) ठेवले जाणार आहेत. या इक्विटी समभागांची दर्शनी किंमत ₹1 प्रति समभाग असेल.
श्यामसुंदर राठी, शैलेश राठी आणि शिल्पा राठी हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत.
10,000,000 इक्विटी समभागांच्या विक्रीसाठीच्या प्रस्तावामध्ये श्यामसुंदर राठी यांच्याकडून 5,000,000 समभाग आणि शैलेश राठी यांच्याकडून 5,000,000 समभागांचा समावेश आहे. (या दोघांना एकत्रितपणे “प्रमोटर विक्री समभागधारक” (Promoter Selling Shareholders) असे संबोधले जाते आणि हे समभाग “प्रस्तावित समभाग” (Offered Shares) म्हणून ओळखले जातात.)
विद्या वायर्स लिमिटेड IPO मधून मिळणाऱ्या निव्वळ निधीचा उपयोग पुढील गोष्टींसाठी करणार आहे: उपकंपनी ALCU साठी नवीन प्रकल्प उभारण्यासाठी लागणाऱ्या भांडवली खर्चाची पूर्तता, कंपनीने घेतलेल्या सर्व किंवा काही प्रलंबित कर्जाची पूर्ण किंवा अंशतः परतफेड, सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी.
कंपनी उद्योगात भारतातील चौथ्या क्रमांकाची मोठी उत्पादक आहे आणि FY24 मध्ये 5.9% स्थापित क्षमतेचा बाजार वाटा आहे (स्रोत: CareEdge Report). उत्पादन क्षमता वाढविणे आणि उत्पादन श्रेणी अधिक विविध बनविण्याचे नियोजन करत, कंपनी आपली बाजारातील स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये प्रीसिजन-इंजिनीयर वायर्स, इनॅमल्ड कॉपर रेक्टॅंग्युलर स्ट्रिप्स, पेपर इन्सुलेटेड कॉपर कंडक्टर्स, कॉपर बसबार आणि बेअर कॉपर कंडक्टर्स, विशेष वायंडिंग वायर्स, पीव्ही रिबन आणि अॅल्युमिनियम पेपर कव्हर्ड स्ट्रिप्स यांचा समावेश आहे. ही उत्पादने ऊर्जा निर्मिती आणि प्रसारण, विद्युत प्रणाली, इलेक्ट्रिक मोटर्स, स्वच्छ ऊर्जा प्रणाली, इलेक्ट्रिक मोबिलिटी, रेल्वे अशा विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वापरली जातात. उत्पादनांचे उपयोजन प्रामुख्याने त्यांची चालकता, टिकाऊपणा आणि उष्णताशीलता यासाठी केले जाते. उच्च कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेसाठी ही उत्पादने अत्यावश्यक आहेत. (स्रोत: CareEdge Report)
पँटोमॅथ कॅपिटल अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
डीआरएचपी लिंक: https://pantomath-web.s3.ap-south-1.amazonaws.com/1736742120549-VidyaWiresLimited.pdf


