Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedधन्य धन्य ती जिजामाई युगपुरुषाला जन्म देई शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,...

धन्य धन्य ती जिजामाई युगपुरुषाला जन्म देई शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे यांच्यावतीने राजमाता जिजाबाई जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

पुणे ः धन्य धन्य मातोश्री जिजाई, अंबिका माई, झाली उतराई, हिंदूपदपातशहाची माई, हिंदुधर्माची झाली आई, त्रैलोक्यात दुसरी नाही… अशा शब्दांत राजमाता जिजाबाईंच्या शौर्याचे वर्णन करीत महिला शाहिरांनी पोवाड्याचे सादरीकरण केले. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी च्या सेवाव्रती महिलांनी पारंपरिक वेशात ऐतिहासिक लालमहालात जिजाबाईंना अभिवादन केले.

राजमाता जिजाबाई जयंती निमित्त शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे च्यावतीने ऐतिहासिक लालमहाल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्याख्यात्या सायली गोडबोले, प्रबोधिनीच्या प्रा. संगीता मावळे उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, सिद्धार्थ नवरे, प्रशालेच्या शिक्षिका धनश्री ढावरे, सीमा डोईफोडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स प्रशालेच्या विद्यार्थींनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी स्वराली उन्हाळे आणि प्रबोधिनीच्या युवा सेवाव्रती यांनी राजमाता जिजाबाई यांच्या जीवनावरील पोवाड्याचे सादरीकरण केले.

सायली गोडबोले म्हणाल्या, आज एकविसाव्या शतकात छोट्या छोट्या गोष्टींवरून नैराश्य येण्याचे प्रमाण वाढले आहे. जिजाऊंचे जीवन चरित्र पाहिले तर लक्षात येईल की त्यांच्यासमोर क्षणाक्षणाला येणारी आव्हाने किती मोठी होती. जिद्द, जाणतेपणा, बाणेदारपणा आणि ईश्वराप्रती निष्ठा म्हणजे जिजाबाई. महिलांनी त्यांचे जीवनचरित्र समोर ठेवले तर कधी नैराश्यच येणार नाही, असे ही त्यांनी सांगितले.

संगीता मावळे म्हणाल्या, प्रबोधिनीच्या वतीने लालमहाल येथे दरवर्षी जिजामाता यांची जयंती साजरा केली जाते. यावेळी शाळेतील विद्यार्थीनींना येथे आणले जाते. जिजाऊंचे जीवन चरित्र त्यांच्या पराक्रमाच्या कथा मुलींना कळाव्यात व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी हा उद्देश ठेवून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, असेही त्यांनी सांगितले. डाॅ. मृणालिनी दुसाने यांनी सूत्रसंचालन केले. अक्षदा इनामदार यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments