पुणे, १४ जानेवारी २०२५ : एस डेंटल क्लिनिक, एस हॉस्पिटल, एरंडवणे यांच्या वतीने दि.१६,१७ व १८ जानेवारी २०२५ दरम्यान सकाळी ११ ते २ या वेळेत ‘विनामूल्य दंत तपासणी शिबीर’ चे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये तज्ञ-अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी, सल्ला व डिजिटल एक्स-रे विनामूल्य असेल. तसेच तपासणीनंतरच्या पुढील उपचारांवर २५% सवलतही दिली जाणार आहे. शिबिरासाठी पूर्वनावनोंदणी आवश्यक असून नोंदणीसाठी 020-67029100 / 8956152095 या क्रमांकावर संपर्क साधावा.
एस डेंटल क्लिनिक येथे दात साफ करणे, रूट कॅनल, कृत्रिम दात बसवणे, दातातील कॅव्हीटीवरील उपचार, कवळी बसवणे, वेडीवाकडी दात सरळ करणे याबरोबरच अत्याधुनिक डेंटल चेअर, डिजिटल एक्स -रे, अल्ट्रासोनिक स्केलर, अत्याधुनिक उपकरणे अशा सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.


