Tuesday, September 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे शहरात वाहतूक बदलाबाबत तात्पुरते आदेश जारी नागरिकांनी सहकार्य करण्याचे वाहतूक...

पुणे शहरात वाहतूक बदलाबाबत तात्पुरते आदेश जारी नागरिकांनी सहकार्य करण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्ताचे आवाहन

पुणे, दि. 14 : गणेशखिंड रोडवरील पुणे विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान टाटा मेट्रोचे काम सुरू असून वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता वाहतूकीत तात्पुरत्या स्वरुपात बदलाबाबतचे आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त अमोल झेंडे यांनी जारी केले आहे.

बाणेर कडुन शिवाजीनगर कडे जाणारी वाहतुक :- बाणेरकडून येणारी वाहतुक औध रोडवर वळवून राजभवन समोरील पंक्चर मधून युटर्न घेवून पुन्हा विद्यापीठ मार्गे शिवाजीनगर इच्छितस्थळी जातील.

शिवाजीनगरकडून औंध कडे जाणारी वाहतुक:- शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक ही पुणे विद्यापीठ चौकातून सरळ औंधरोड मार्गे इच्छितस्थळी जातील.

औंधकडून शिवाजीनगर कडे जाणारी वाहतुक:- औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतुक ही मिलेनियम गेट चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या गेटमधून पुणे विद्यापीठ परिसर-उजवीकडे वळून-वाय जंक्शन- विदयापीठ मुख्य प्रवेशव्दारातून बाहेरपडून इच्छितस्थळी जातील. नागरीकांनी वाहतूक बदल मार्गाचा वापर करुन वाहतूक शाखेचे कर्मचारी, स्वयंसेवक यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. झेंडे यांनी केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments