Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedसाउथ युनायटेड फुटबॉल क्लबच्या इंटर-सिटी स्पर्धेत पुण्याच्या संघांचा विजेतेपदाचा चौकार

साउथ युनायटेड फुटबॉल क्लबच्या इंटर-सिटी स्पर्धेत पुण्याच्या संघांचा विजेतेपदाचा चौकार

पुणे, १४ जानेवारी २०२५: पहिल्या एसयूएफसी इंटर-सिटी फुटबॉल स्पर्धेत पुण्यातील संघांनी वेगवेगळ्या वयोगटातील पाचपैकी चार विजेतेपदे जिंकली, जिथे साउथ युनायटेड फुटबॉल अकादमीच्या बेंगळुरू आणि पुणे येथील मुलांनी बेंगळुरूतील उलसूर येथील क्लबच्या अत्याधुनिक सुविधेत एकमेकांविरुद्ध स्पर्धा केली. पुणे केंद्रांमधील खेळाडूंनीही स्पर्धेत बहुतेक वैयक्तिक पुरस्कार मिळवून आपली क्षमता सिद्ध केली.

या स्पर्धेत दोन्ही शहरांमधील २५० हून अधिक तरुण फुटबॉलपटूंनी सहभाग घेतला, जिथे एसयूएफसीने तळागाळातील फुटबॉल उपक्रमांना आपले महत्त्व दाखवून दिले. पुण्यातील संघांनी ९, ११, १३ आणि १५ वर्षा खालील गटात विजेतेपद पटकावले तर १७ वर्षाखालील गटात बेंगळुरूच्या एसयूएफसी पिलर्सने अजिंक्यपद जिंकले.

वैयक्तिक पुरस्कार-९ वर्षांखालील
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : अगस्त्य सुरेश (बेंगळुरू)
सर्वोत्कृष्ट खेळाडू : एकम सिंग (पुणे)
उदयोन्मुख खेळाडू: ऑस्टिन लॉरिगिओ (बेंगळुरू), नोराह गुप्ता (पुणे)
उदयोन्मुख प्रशिक्षक: रियान यादगिरी (पुणे), नवीन कुमार (बेंगळुरू)
११वर्षाखालील
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : अर्हत्वा डोंगरे (पुणे)
सर्वोत्कृष्ट खेळाडू : अव्यक्त नंदी (पुणे)
उदयोन्मुख खेळाडू: कबीर धूत (पुणे), शनाया (बेंगळुरू)
उदयोन्मुख प्रशिक्षक: प्रतीक्षा देवांग (पुणे), उमाशंकर (बेंगळुरू)
१३ वर्षांखालील
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : दियान गोयल (पुणे)
सर्वोत्कृष्ट खेळाडू : जेडेन जोसेफ (बेंगळुरू)
उदयोन्मुख खेळाडू: डेलिझा उनवाला (बेंगळुरू)
उदयोन्मुख प्रशिक्षक: प्रबुद्ध गायकवाड (पुणे), अदिती पी. जाधव (बेंगळुरू)
१५ वर्षांखालील
सर्वोत्तम गोलरक्षक: सिद्धार्थ गुप्ता (बेंगळुरू)
सर्वोत्तम खेळाडू: अर्पित मिश्रा (पुणे)
उदयोन्मुख प्रशिक्षक: मोहसीन अब्दुल्ला तांबोळी (पुणे), सिद्धार्थ मिश्रा (बेंगळुरू)
१७ वर्षांखालील
सर्वोत्तम खेळाडू: हर्षित एस.व्ही. (बेंगळुरू)

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments