Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने रिव्हर सायक्लॉथॉन २०२५

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने रिव्हर सायक्लॉथॉन २०२५

पिंपरी, दि. १५ जानेवारी २०२५ :- नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धन तसेच वाहतूक सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी नागरिकांना सायकल चालविण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी रिव्हर सायक्लॉथॉन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी रिव्हर सायक्लॉथॉनमध्ये सर्वात लांब सायकल साखळीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करण्यात आली. ही बाब अभिमानास्पद असून यावर्षी देखील जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन, शिवांजली सखी मंच, सायकल मित्र पुणे आणि अविरत श्रमदान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ ते ९ या वेळेत भोसरी येथील गावजत्रा मैदानात रिव्हर सायक्लॉथॉन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.

आयुक्त सिंह म्हणाले, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या उपक्रमांस नागरिकांचा देखील उस्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. शहरातील वायू प्रदूषण कमी करण्याच्या करण्याच्या दृष्टीने संदेश देण्याचा प्रयत्न सायक्लॉथॉनच्या माध्यमातून केला जाणार आहे. प्रदूषण विरहीत वाहतुकीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबत रस्त्यांवर सुरक्षित सायकल चालविण्याच्या पद्धतींना तसेच जबाबदारीने वाहन चालविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्यदायी आणि अधिक शाश्वत शहरी पर्यावरणाला हातभार लावत रस्त्यांवर सुरक्षितता आणि परस्पर आदराची संस्कृती जोपासण्याचे उद्दिष्ट यामागे आहे. मानवी आरोग्य, शेती, जलचर परिसंस्था आणि त्याच्या जीवनशक्तीवर अवलंबून असलेल्या सर्वांवर प्रदूषणामुळे घातक परिणाम होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सामुहिक कृतीद्वारे शाश्वत बदल घडवून आणण्याचा मानस असल्याचे सिंह यांनी सांगितले.

नदी स्वच्छता हा निरंतर चालणारा उपक्रम असून यामध्ये जनसहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. यंदा रिव्हर सायक्लॉथॉनची ‘ट्रॅफिक रुल ॲन्ड सेफ्टी’ अर्थात ‘वाहतूक सुरक्षेबाबत जागरूकता’ अशी संकल्पना असून पर्यावरण प्रेमी, सायकलपटू, युवा खेळाडू तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments