मुंबई, १५ जानेवारी २०२५ – एचडीएफसी लाइफच्या संचालक मंडळाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी समाप्त झालेल्या नऊमाहीसाठी स्वतंत्र व एकत्रित आर्थिक निकाल मंजूर करून स्वीकारले आहेत. कंपनीने सर्व महत्त्वपूर्ण बाबींमध्ये सर्वोत्तम व सातत्यपूर्ण कामगिरी करत सकारात्मक गती कायम राखली.
कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:
§ उच्च-स्तरीय वाढ: वैयक्तिक एपीईमध्ये प्रबळ २४ टक्के वाढीची नोंद केली, ज्याला विक्री करण्यात आलेल्या पॉलिसी आणि संतुलित उत्पादन संयोजनामध्ये १५ टक्के वाढीचे पाठबळ मिळाले.
§ मार्केट शेअर: एकूण मार्केट शेअर (वैयक्तिक डब्ल्यूआरपी) ७० बीपीएसने वाढून १०.८ टक्क्यांपर्यंत पोहोचला. खाजगी क्षेत्र मार्केट शेअर १५.३ टक्क्यांपर्यंत पोहोचले.
§ नवीन व्यवसायाचे मूल्य (व्हीएनबी) १४ टक्क्यांनी वाढून २,५८६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले, ज्यामधून लाभदायी व्यवसायामधील प्रबळ वाढ दिसून येते.
§ अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम): एयूएम ३१ डिसेंबर २०२४ रोजी ३.३ लाख कोटी रूपये राहिले, ज्यामध्ये वार्षिक १८ टक्क्यांची वाढ झाली.
§ सातत्यता: १३व्या व ६१व्या महिन्याचे सातत्यता प्रमाण अनुक्रमे ८७ टक्के आणि ६१ टक्क्यांपर्यंत पोहोचले, ज्यामध्ये अनुक्रमे ११० बेसिस पॉइण्ट्स व ७८० बेसिस पॉइण्ट्सची वाढ झाली. यामधून कंपनीची ग्राहकांसोबत संलग्न होण्यासोबत त्यांना कायम ठेवण्याची क्षमता दिसून आली.
§ एम्बेडेड व्हॅल्यू (ईव्ही) १८ टक्क्यांनी वाढून ५३,२४६ कोटी रूपयांवर पोहोचले, तसेच ईव्हीवरील कार्यरत परताव्यामध्ये १६.० टक्क्यांची नोंद केली, यामधून पॉलिसीधारक आणि शेअरधारकांसाठी स्थिर दीर्घकालीन मूल्य निर्मिती दिसून आली.
§ आर्थिक वर्ष २५ च्या नऊमाहीत १,३२६ कोटी रूपयांचा करोत्तर नफा (पीएटी) संपादित करण्यात आला, ज्यामध्ये वार्षिक १५ टक्के वाढीची नोंद करण्यात आली, ज्याला आमच्या बॅक बुकमधील मिळालेल्या नफ्यामधील १८ टक्के वाढीची मदत झाली.
§ सॉल्वन्सी रेशिओ १८८ टक्के राहिले, जे नियामक थ्रेशोल्ड १५० टक्क्यांपेक्षा जास्त होते.
§ कर्मचाऱ्यांवर फोकस: ग्रेट प्लेस टू वर्कने इंडियाज टॉप ५० बेस्ट वर्कप्लेसेस् फॉर विमेन म्हणून सन्मानित केले. तसेच, कंपनी बिझनेस टूडेच्या इंडियाज मोस्ट व्हॅल्यूबल कंपनीजच्या बीटी५०० यादीमध्ये सामील झाली.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विधान:
एचडीएफसी लाइफच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर म्हणाल्या, ”आम्ही आर्थिक वर्ष २५ च्या नऊमाहीसाठी वैयक्तिक डब्ल्यूआरपीच्या आधारावर २२ टक्क्यांच्या प्रबळ वाढीची नोंद केली आहे, जेथे एकूण १४ टक्क्यांच्या उद्योग वाढीला मागे टाकले आहे. आम्हाला या कालावधीदरम्यान तिकिट आकार आणि आकारमानामध्ये विस्तार होताना निदर्शनास आले आहे. पॉलिसींची संख्या १५ टक्क्यांनी वाढली असून खाजगी क्षेत्राच्या ९ टक्के वाढीला मागे टाकले आहे. रिटेल संरक्षणामध्ये देखील वाढ होत आहे. नऊमाहीसाठी रिटेल संरक्षण एपीईमध्ये २८ टक्क्यांची वाढ दिसण्यात आली. आम्ही गतीशीलपणे व स्थिरतेसह सर्वसमावेशक बाजारपेठ लँडस्केपशी जुळवून घेण्याप्रती कटिबद्ध आहोत. यामध्ये आमच्या भागधारकांना दीर्घकालीन मूल्य देण्यासाठी वितरण, टेक आणि ग्राहक-केंद्रित उत्पादन नाविन्यतांमधील सातत्यपूर्ण गुंतवणूकीचा समावेश आहे.”
प्रमुख आर्थिक सारांश
कोटी रूपये
आर्थिक वर्ष २५ ची नऊमाही
आर्थिक वर्ष २४ ची नऊमाही
वार्षिक वाढ
प्रमुख आर्थिक आणि अॅक्चुरियल मेट्रिक्स
वैयक्तिक एपीई
८,९८६
७,२७१
२४ टक्के
एकूण एपीई
१०,२९३
८,५६४
२० टक्के
नवीन बिझनेस प्रीमियम (वैयक्तिक + ग्रुप)
२२,३९६
२०,१००
११ टक्के
नूतनक्षम प्रीमियम (वैयक्तिक + ग्रुप)
२४,६१७
२२,०३९
१२ टक्के
एकूण प्रीमियम
४७,०१३
४२,१३९
१२ टक्के
असेट्स अंडर मॅनेजमेंट
३,२८,६८४
२,७९,७०७
१८ टक्के
करोत्तर नफा
१,३२६
१,१५७
१५ टक्के
इंडियन एम्बेडेड व्हॅल्यू
५३,२४६
४५,१७३
१८ टक्के
नवीन व्यवसायाचे मूल्य
२,५८६
२,२६७
१४ टक्के
आर्थिक वर्ष २५ ची नऊमाही
आर्थिक वर्ष २४ ची नऊमाही
मुख्य आर्थिक रेशिओ
नवीन व्यवसायाचे मार्जिन्स
२५.१ टक्के
२६.५ टक्के
ईव्हीवर ऑपरेटिंग रिटर्न
१६.० टक्के
१६.५ टक्के
एकूण खर्च / एकूण प्रीमियम
२०.८ टक्के
१९.६ टक्के
सॉल्वन्सी रेशिओ
१८८ टक्के
१९० टक्के
१३ महिने / ६१ महिने सातत्यता
८७ टक्के/६१ टक्के
८६ टक्के/५४ टक्के
वैयक्तिक डब्ल्यूआरपी मार्केट शेअर (एकूण)
१०.८ टक्के
१०.१ टक्के
वैयक्तिक एपीईद्वारे उत्पादन मिश्रण (यूएल/ नॉन पर सेव्हिंग्स /अॅन्युइटी/ संरक्षण/ पर)
३७/३५/५/६/१८
३२/२८/७/६/२८
वैयक्तिक एपीईद्वारे वितरण मिश्रण (कॉर्प एजंट्स / एजन्सी / ब्रोकर/ डायरेक्ट)
६४/१७/७/११
६४/१८/६/११
टिप: टक्केवारी एकूण प्रभावामुळे वाढलेली दिसेलच असे नाही.
व्याख्या आणि संक्षेप
· अॅन्युलाइज्ड प्रीमियम इक्विव्हॅलंट (एपीई) – वार्षिकीकृत पहिल्या वर्षाच्या नियमित प्रीमियम्स आणि १० टक्के भारित सिंगल प्रीमियम तसेच सिंगल प्रीमियम टॉपअप्सची रक्कम.
· अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम) – विमाकंपनीने व्यवस्थापित केलेली समभागधारक आणि पॉलिसीधारकांच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य.
· एम्बेडेड व्हॅल्यू ऑपरेटिंग प्रॉफिट (ईव्हीओपी) – एम्बेडेड व्हॅल्यू ऑपरेटिंग प्रॉफिट (“ईव्हीओपी”) हे कोणत्याही दिलेल्या कालावधीत ईव्हीमधील वाढीचे माध्यम असून त्यातून आर्थिक घटकांमधील बदल तसेच भांडवल समावेश किंवा लाभांश प्रदान यांच्यासारख्या समभागधारकांच्या कृतींमुळे झालेला प्रभाव वजा केला जातो.
· पहिल्या वर्षाचा प्रीमियम – आर्थिक वर्षात पहिल्या पॉलिसी वर्षात प्राप्त झालेले नियमित प्रीमियम. उदाहरणार्थ, मार्च २०२४ मध्ये विकल्या गेलेल्या मासिक स्तरावरील पॉलिसीसाठी प्राप्त झालेला पहिला मासिक हप्ता २०२३-२४ साठी पहिल्या वर्षाचा प्रीमियम मानला जाईल आणि पहिल्या पॉलिसी वर्षातील उर्वरित ११ हप्ते प्राप्त झाल्यावर २०२४-२५ मधील पहिल्या वर्षाचे हप्ते मानले जातील.
· नवीन बिझनेसमुळे मिळालेला प्रीमियम – नवीन बिझनेसमुळे पहिल्या वर्षातील प्रीमियम आणि एकल प्रीमियमची रक्कम, जी एकूण प्रीमियम म्हणून दर्शवली जाते.
· ऑपरेटिंग खर्च – यात नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी आलेले खर्च आणि पॉलिसी सर्व्हिसिंगसाठी (देखभाल खर्च मानले गेलेले) आलेले खर्च समाविष्ट केले जातात, ज्यात समभागधारकांचे खर्च समाविष्ट असतात. त्यात कमिशन समाविष्ट नसते.
· ऑपरेटिंग खर्चाचा रेशिओ – ऑपरेटिंग खर्चाचा (समभागधारकांच्या खर्चासह) एकूण प्रीमियमशी असलेला रेशिओ.
· ईव्हीवरील ऑपरेटिंग रिटर्न – ईव्हीवरील ऑपरेटिंग रिटर्न म्हणजे दिलेल्या कालावधीत ईव्हीओपी (एम्बेडेड व्हॅल्यू ऑपरेटिंग प्रॉफिट)चा त्या कालावधीच्या सुरूवातीला ईव्हीशी असलेला रेशिओ होय.
· सातत्यता – कमी झालेल्या बिझनेसपासून नूतनीकरण झालेल्या बिझनेसचे प्रमाण. हा रेशिओ दिलेल्या पॉलिसीज आणि प्रीमियम्सच्या संख्येच्या संदर्भात मोजला जातो.
· प्रीमियम लेस बेनिफिट्स पेआऊट्स – मिळालेला एकूण प्रीमियम आणि प्रदान केलेले लाभ यांच्यातील फरक (सकल पुनर्विमा).
· रिन्यूअल प्रीमियम – पहिल्या पॉलिसी वर्षानंतर प्राप्त झालेले नियमित रिकरिंग प्रीमियम.
· सॉल्वन्सी रेशिओ – सॉल्वन्सी मार्जिन राखण्यासाठी उपलब्ध असलेल्या सॉल्वन्सी मार्जिनचा रेशिओ.
· एकूण प्रीमियम – पहिल्या वर्षाच्या, एकल व नूतनक्षम प्रीमियमसह वैयक्तिक आणि समूह व्यवसायासाठी वर्षभरात प्राप्त झालेले एकूण प्रीमियम
· वेटेड रिसीव्ह्ड प्रीमियम (डब्ल्यूआरपी) – वर्षभरात प्राप्त झालेल्या पहिल्या वर्षाचे प्रीमियम आणि टॉप-अप प्रीमियम्ससह १० टक्के एकल प्रीमियम्सची बेरीज.


