पुणे : अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा माऊली आणि प्रेरणा पुरस्कार सोहळा शनिवार दिनांक १८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता स.प.महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात होणार आहे. यंदाचा माऊली पुरस्कार शोभा कवितके आणि प्रेरणा पुरस्कार सरहद पुणे या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, माजी मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे उपस्थित राहणार आहेत.
हेल्थकेअर सायंटिफिक चे प्रवीण कवितके यांच्या शोभा कवितके या मातोश्री आहेत. काश्मीर खोऱ्यात दुर्लक्षित सीमा भागात शिक्षण पोहोचविणारी आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य जबाबदारी घेणाऱ्या सरहद संस्थेला प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


