Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedट्रायबल फेस्टमधून उलगडली आदिवासी संस्कृती युनिव्हर्सल ट्रायब्स्, अलर्ट आणि आर्ट फाउंडेशनच्या वतीने...

ट्रायबल फेस्टमधून उलगडली आदिवासी संस्कृती युनिव्हर्सल ट्रायब्स्, अलर्ट आणि आर्ट फाउंडेशनच्या वतीने युनिव्हर्सल ट्रायब्स् बिग ग्रीन फेस्ट २०२५ चे आयोजन

पुणे ः वारली आणि गोंड चित्रातून उलगडणारी आदिवासी जीवनशैली… आदिवासी हस्तकलेच्या ढोकरा शिल्प आणि नागा दागिन्यातून झळकणारा पारंपरिक साज…कपड्यांवरील नक्षीदार वीण आणि बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंमधील कोरीव हस्तकला… वन्य वनस्पतींपासून तयार केलेले औषधी पदार्थ… अशा विविध गोष्टींतून आदिवासी जीवनशैलीशी जोडणारे प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली.

युनिव्हर्सल ट्रायब्स्, अलर्ट आणि आर्ट फाउंडेशनच्या वतीने युनिव्हर्सल ट्रायब्स् बिग ग्रीन फेस्ट २०२५ चे आयोजन घोले रोड येथील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी मध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार वंदना चव्हाण आणि डॉ. रमेश रघतवान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, गणेश शिंदे, संस्थेचे संस्थापक रजत रघतवान हे उपस्थित होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन गोफ या आदिवासी नृत्य शैलीतून झाले. त्यानंतर लेझीम नृत्यातून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रदर्शनात आसाम बांबूपासून तयार केलेली विविध भांडी, शोभेच्या वस्तू, ढेकरा शिल्पातील विविध वस्तू, नागा पद्धतीचे दागिने, विविध हर्बल उत्पादने, वारली आणि गोंड चित्रातून दाखविलेली आदिवासी जीवनशैली प्रदर्शनात दाखविण्यात आली आहे. हे प्रदर्शन १९ जानेवारी २०२५ पर्यंत सकाळी ११ ते रात्री ७ पर्यंत खुले राहणार आहे.

रजत रघतवान म्हणाले, या प्रदर्शनाच्या माध्यमातून आदिवासी समुदायातील नायकांना आम्ही श्रद्धांजली समर्पित केली आहे. हे व्यासपीठ निर्माण करून आम्ही आदिवासी समुदायातील लोकांची कला आणि त्यांच्या संस्कृतीला जतन करण्याचे कार्य करीत आहोत तसेच पुढील पिढीला ही कला समजावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments