Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedफिनिक्स मार्केटसिटी पुणे’मध्ये, राममंदिरातील प्राणप्रतिष्ठेनिमित्त डिव्हाइन व्हायब्रेशन्स या नावाने, भगवान हनुमानाच्या 25...

फिनिक्स मार्केटसिटी पुणे’मध्ये, राममंदिरातील प्राणप्रतिष्ठेनिमित्त डिव्हाइन व्हायब्रेशन्स या नावाने, भगवान हनुमानाच्या 25 फुटी शिल्पाचे अनावरण

पुणे, 22 जानेवारी – अयोध्येतील राममंदिराच्या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संस्मरणीय उत्सवाची घोषणा करताना पुणे येथील फिनिक्स मार्केटसिटीला विशेष अभिमान वाटत आहे. अतीव आदर आणि उत्साह व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून फिनिक्स मार्केटसिटी पुणे ने मॉल अट्रिअममध्ये कोणालाही थक्क करून टाकेल अशा भगवान हनुमानाच्या 25 फुटी शिल्पाचे अनावरण 22 जानेवारी 2024 रोजी केले आहे.

 

राममंदिराच्या उद्घाटनामुळे वातावरणात पसरलेला आनंद व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून हे भव्य शिल्प लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्यांच्या अयोध्येतील जन्मस्थळी होत असल्याबद्दल त्यांना वंदन करण्याचे हे एक प्रतीक आहे. भगवान हनुमानाची 25 फुटी आकृती 26,000 हाताने तयार केलेल्या ब्रासच्या घंटांनी सुशोभित करण्यात आली आहे. दैवी चैतन्याचा अर्क असलेल्या या शिल्पामुळे अट्रिअम 5 नेत्रदीपक होणार आहे. सांस्कृतिक सौहार्दाच्या चैतन्याने समुदायाला एकत्र आणणे हा या शिल्पाच्या स्थापनेमागील हेतू आहे. जगभरात ही ऐतिहासिक घटना साजरा करणाऱ्या कोट्यवधी हिंदूंच्या भावनांचा हा प्रतिध्वनी आहे. भगवान हनुमानाच्या या विराट प्रतिमेतील कारागिरी व बारीक तपशिलांकडे पुरवण्यात आलेले लक्ष हे केवळ आपल्या कलात्मक उत्कृष्टतेचे प्रतीक नाही, तर भारताच्या समृद्ध इतिहासाप्रती व धार्मिक वारशाप्रती मनापासून व्यक्त करण्यात आलेला आदर आहे.

 

भगवान हनुमानाच्या शिल्पाचे डिझाइन सौ. चारुवी अग्रवाल ह्यांनी केले आहे. त्या प्रसिद्ध अॅनिमेशनपट दिग्दर्शक, निर्मात्या व कलावंत आहेत. त्यांच्या फिल्म्स अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाल्या आहेत तसेच त्यांच्या कलाकृतीही अनेक सार्वजनिक मंचांवर लावण्यात आल्या आहेत. शिवाय, भारतातील अनेक गुणग्राही संग्राहकांच्या घरांमध्येही त्यांच्या कलाकृती विराजमान आहेत. रूपांतरणात्मक तसेच खिळवून ठेवणाऱ्या कथाकथनामध्ये भारतीय पुराणांतील घटकांचा समावेश करण्याच्या दृष्टीने त्यांच्या कलेने नेहमीच संवादात्मक तंत्रज्ञान, रचना व कारागिरीच्या चौकटी ओलांडल्या आहेत. 2021 मध्ये त्यांनी ‘द लीजंड ऑफ हनुमान’ ह्या अॅनिमेटेड मालिकेची सहनिर्मिती केली होती. ही मालिका डिस्ने+हॉटस्टारवर प्रसारित करण्यात आली होती. अविश्वसनीय दृश्य रचना व अॅनिमेशनसाठी ही मालिका नावाजली गेली होती. 2021, 2022, 2024 सालातील सर्वाधिक बघितल्या गेलेल्या मालिकांमध्ये या मालिकेचा समावेश होता आणि IMDB.com वर या मालिकेला 9.2 असे उत्तम रेटिंगही प्राप्त झाले आहे.

 

“अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासारख्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटनेचे साक्षीदार होणे आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. भगवान हनुमानाच्या 25 फुटी शिल्पाची स्थापना म्हणजे ह्या सामूहिक आनंदात तसेच जगभरातील कोट्यवधी हिंदूंच्या मनातील आदरात आमचेही योगदान देण्याचा एक भाग आहे. हे एकता, भक्ती आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे,” असे फिनिक्स मार्केटसिटी पुणे’चे केंद्र संचालक अंशुमन भारद्वाज म्हणाले.

 

हे शिल्प सर्वांना बघण्यासाठी खुले आहे. भगवान हनुमानाच्या शिल्पातील भव्यता व कारागिरी बघण्यासाठी सर्वांना आमंत्रित केले जात आहे. हे शिल्प 22 जानेवारी 2024 पासून लावले जाईल. राममंदिराच्या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठेची पार्श्वभूमी तयार करण्यात हे शिल्प योगदान देईल. पुण्याच्या हृदयस्थानात या ऐतिहासिक क्षणाचा ठसा उमटवताच, पुण्यातील फिनिक्स मार्केटसिटी सर्व पाहुण्यांना तसेच हितचिंतकांना या सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्वाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित कर

त आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments