नावीन्य घडवून आणण्याची प्रभावी संस्कृती, एआय आणि पुढील पिढीच्या क्षमतांमध्ये सातत्याने गुंतवणूक, जगभरात वाढता विस्तार व धोरणात्मक विचार नेतृत्वासह, टीसीएसने ब्रँड फायनान्स आयटी सर्व्हिसेस २०२५ रँकिंगमध्ये मजबूत स्थान मिळवले आहे
दावोस, मुंबई, भारत, २१ जानेवारी २०२५: आयटी सेवा, कन्सल्टिंग आणि व्यावसायिक उपाययोजनांमध्ये जागतिक स्तरावर आघाडीच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) (बीएसई: 532540, एनएसई: टीसीएस) २१.३ बिलियन डॉलर्सचे ब्रँड मूल्यांकन असलेला दुसरा जागतिक आयटी सेवा ब्रँड बनून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. २०१० मध्ये २.३ बिलियन डॉलर्स ते मागील १५ वर्षांमध्ये ब्रँड मूल्यामध्ये उल्लेखनीय ८२६% वृद्धीसह, टीसीएसने आयटी सेवा उद्योगक्षेत्रात लीडर म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. टीसीएसने नावीन्य, ग्राहक समाधान आणि धोरणात्मक मार्केटिंग उपक्रम यामध्ये सातत्याने गुंतवणूक केल्याचे हे फळ आहे.
ब्रँड फायनान्सचे सीईओ आणि चेयरमन डेव्हिड हेग यांनी सांगितले, “ब्रँड फायनान्समध्ये आम्ही जवळपास दोन दशकांपासून टीसीएसला ट्रॅक करत आहोत. ही कंपनी ज्याप्रकारे आपल्या व्यवसायांमध्ये सातत्याने नावीन्य आणून आपल्या ब्रँडला जागतिक मंचावर प्रस्तुत करते, ते पाहून मी खूप प्रभावित झालो आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी या कंपनीला या महत्त्वाच्या टप्प्यावर आणून पोहोचवले आहे, ज्याठिकाणी टीसीएस ब्रँड मूल्यामध्ये २० बिलियनचा ऐतिहासिक आकडा पार करणारी या उद्योगक्षेत्रातील दुसरी कंपनी बनली आहे. आपला ब्रँड अतिशय अभिमानाने पुढे नेत असलेल्या सर्व ६०० हजार TCSers चे हार्दिक अभिनंदन.”
टीसीएसने सातत्याने स्वतःला जागतिक उद्योगांसाठी एक विश्वसनीय सहयोगी म्हणून सिद्ध केले आहे, जो त्यांना गुंतागुंतीची आव्हाने दूर करणारी प्रगत तंत्रज्ञान सोल्युशन्स प्रदान करतो.
आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये नेतृत्वस्थान मिळवून टीसीएसने नावीन्याप्रती आपली वचनबद्धता मजबूत केली आहे. टीसीएस हे सुनिश्चित करते की त्यांची एआय-चालित सोल्युशन्स न केवळ संचालन अनुकूलित करतील आणि ग्राहक अनुभवांमध्ये सुधारणा घडवून आणतील, इतकेच नव्हे तर नैतिक आणि दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्याला देखील प्राथमिकता देतील. नाविन्याबरोबरीनेच ग्राहक समाधान टीसीएसच्या यशाचा आधार बनले आहे. २०२४ मध्ये टीसीएसला व्हाईटलेन रिसर्चने युरोपमध्ये ग्राहक समाधानासाठी #१ आयटी सेवा प्रदाता हा दर्जा बहाल केला, जो टीसीएसची ग्राहक-केंद्रितता आणि कार्यान्वयनातील उत्कृष्टता दर्शवतो.
टीसीएसची आपल्या ग्राहकांप्रती वचनबद्धता स्थिरतेप्रती त्यांच्या समर्पणाला अनुरूप आहे. कारखाने आणि व्यापारी ठिकाणी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी डिजिटल ट्विन तंत्राचा उपयोग करण्यापासून जगातील पहिले हायड्रोजन-चालित विमान इंजिन विकसित करण्यासाठी रोल्स रॉयससोबत सहयोग करण्यापर्यंत टीसीएस शाश्वतेच्या क्षेत्रामध्ये नावीन्याला प्रोत्साहन देत आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे चीफ मार्केटिंग ऑफिसर श्री अभिनव कुमार यांनी सांगितले, “आम्ही दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसोबत २०२५ नवीन वर्षात पाऊल ठेवत आहोत, आमच्या ब्रँडला हे महत्त्वाचे यश संपादन करताना आणि उद्योगक्षेत्रामध्ये आघाडीचे स्थान अधिक मजबूत करताना पाहून आम्ही खूप खुश आहोत. आम्ही १५ वर्षांपासून WEF चे धोरणात्मक भागीदार आहोत आणि या वर्षांमध्ये आमच्या ब्रँडचे मूल्य जवळपास ९ पटींनी वाढले आहे आणि आम्हाला जागतिक स्तरावर नावीन्यामध्ये अग्रणी, जगामध्ये सर्वात गुंतागुंतीची तंत्रज्ञान कामे करण्याची क्षमता असलेली कंपनी आणि ग्राहकांसोबत दीर्घकालीन मूल्य भागीदारी करणारे सहयोगी ही ओळख प्राप्त झाली आहे. मी त्या हजारो TCSers चे आभार मानतो जे प्रत्येक सेकंद या महान ब्रँडच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील राहण्यात आणि हा ब्रँड जगण्यात अभिमान बाळगतात. आम्ही सर्व पुढे दीर्घकाळपर्यंत एकमेकांच्या साथीने काम करत राहू.”
टीसीएस मार्केटिंगमध्ये उत्कृष्टतेवर भर देते त्यामुळे ब्रँडची व्हिजिबिलिटी आणि जागतिक पोहोच वाढली आहे. ही कंपनी जगभरामध्ये १४ प्रमुख एन्ड्युरन्स रनिंग रेसेसना प्रायोजित करते, ज्यामध्ये पाच प्रतिष्ठित अबॉट वर्ल्ड मॅरेथॉन मेजरचा समावेश आहे: न्यूयॉर्क, लंडन, बॉस्टन, शिकागो आणि आता सिडनी देखील. यामध्ये दरवर्षी ६००००० पेक्षा जास्त रनर सहभागी होतात. फ्युचर ऍथलिट प्रोजेक्टसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून टीसीएस हार्ट फंक्शन मॉनिटर करण्यासाठी आणि ऍथलिटची कामगिरी वाढवण्यासाठी प्रगत डिजिटल ट्विन तंत्राचा उपयोग करते. त्यांचे हे प्रयत्न आरोग्य, कल्याण आणि सामुदायिक विकासाप्रती त्यांची वचनबद्धता मजबूत करतात.
जग्वार टीसीएस रेसिंगला देखील ही कंपनी सहयोग प्रदान करते, जी जगातील पहिल्या ऑल-इलेक्ट्रिक रेसिंग सीरिज, ABB FIA फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये असते. हा सहयोग शाश्वत तंत्रज्ञानामध्ये नावीन्याला प्रोत्साहन देण्याच्या आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या प्रगतीसाठी टीसीएसचे समर्पण अधोरेखित करतो. गेल्या काही वर्षांमध्ये प्रमुख ग्राहक परिषदा, उद्योग ट्रेड शो आणि तंत्रज्ञान भागीदारीमार्फत टीसीएस आजच्या गतिमान वातावरणामध्ये व्यवसायांना अधिक चांगल्या पद्धतीने अनुकूलित करण्यात मदत करण्यासाठी जगभरामध्ये लाखो ग्राहकांसोबत संपर्क व संवाद प्रस्थापित करत आहे.
टीसीएसने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इलेक्ट्रिक वाहन यासारख्या क्षेत्रांमध्ये अभ्यास आणि सखोल संशोधन करून स्वतःची एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. टीसीएसच्या एआय फॉर बिझनेस स्टडीमध्ये एआयच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यात आले आहे आणि एआयला विविध क्षेत्रांमध्ये कसे लागू करण्यात येत आहे ते दाखवण्यात आले आहे. टीसीएस फ्युचर-रेडी ईमोबिलिटी स्टडी २०२५ वाहतुकीच्या भविष्याला आकार देणाऱ्या ट्रेंड्सवर प्रकाश टाकतो.


