Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedअवघा रंग एक झाला' गालिचा रांगोळी प्रदर्शन शनिवारपासून राष्ट्रीय कला अकादमी आणि...

अवघा रंग एक झाला’ गालिचा रांगोळी प्रदर्शन शनिवारपासून राष्ट्रीय कला अकादमी आणि नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने आयोजन

पुणे : राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) आणि नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अवघा रंग एक झाला’ या गालिचा रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ आणि २६ जानेवारी रोजी अप्पा बळवंत चौकातील नू.म.वि. प्रशालेत सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत हे प्रदर्शन होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय कला अकादमीच्या संचालिका रोमा अमर लांडे यांनी दिली.

प्रदर्शनाचे उद्घाटन २५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. राष्ट्रीय कला अकादमीचे २७ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. त्यानिमित्त संस्थेच्या कला साधकांच्या सहयोगाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे यंदा ६ थे वर्ष आहे.

वंदे मातरम, दिनविशेष, पारंपारिक खेळ, विविध पारंपारिक सांज (दागिने), थ्री डी रांगोळी अशा विविध गालीचा रांगोळी पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य प्रवेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments