Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेस् (एचसीसीबी) कडून जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा (झेडपीपीएस), निरगुडसर, आंबेगाव,...

हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेस् (एचसीसीबी) कडून जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा (झेडपीपीएस), निरगुडसर, आंबेगाव, पुणे येथे डिजिटल स्‍मार्टबोर्डचे उद्घाटन

आंबेगाव, पुणे, 23 जानेवारी २०२५ – हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजस् (एचसीसीबी)ने जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा (झेडपीपीएस), निरगुडसर, आंबेगाव, पुणे येथे अत्‍याधुनिक डिजिटल क्‍लासरूम सुरु केले आहे. खासदार डॉ. अमोल कोल्‍हे, यांच्‍या हस्‍ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्‍यात आले.

हा उपक्रम एचसीसीबीच्‍या कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्रोग्रामचा भाग आहे, जो महाराष्ट्रात विद्यार्थ्‍यांसाठी शैक्षणिक अनुभव अधिक दर्जेदार करण्‍यावर लक्ष केंद्रित करतो. क्‍लासरूममध्‍ये तंत्रज्ञानाचा समावेश करत नवीन स्‍थपित करण्‍यात आलेल्‍या स्‍मार्ट बोर्ड्सचा परस्‍परसंवादी, सर्वसमावेशक व डायनॅमिक अध्‍ययन वातावरणाला चालना देण्‍याचा मनसुबा आहे. डिजिटल स्‍मार्टबोर्ड्स क्‍लासरूम अनुभवाचे आधुनिकीकरण करण्‍यामध्‍ये आवश्‍यक साधन म्‍हणून सेवा देतील, ज्‍यामुळे शिक्षक अधिक परस्‍परसंवादी अध्‍यापन करू शकतील आणि व्हिज्‍युअल व डिजिटल साधनांच्‍या माध्‍यमातून गुंतागूंतीच्‍या संकल्‍पना आत्‍मसात करण्‍याच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या क्षमता वाढतील.

याप्रसंगी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्‍हे म्‍हणाले, “आम्‍ही महाराष्‍ट्रातील शिक्षण सुधारण्‍याचा प्रयत्‍न करत असताना हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेस् (एचसीसीबी) सारख्‍या कंपन्‍या आपल्‍या राज्‍याच्‍या शैक्षणिक ध्‍येयांना पाठिंबा देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्‍याचे पाहताना प्रेरणादायी वाटत आहे. झेडपीपीएस निरगुडसर येथे डिजिटल स्‍मार्टबोर्ड्सचे लाँच तंत्रज्ञान पारंपारिक अध्‍ययन व आधुनिक शैक्षणिक गरजांमधील तफावत दूर करू शकण्‍याचे परिपूर्ण उदाहरण आहे. हा उपक्रम सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्‍याच्‍या आमच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे, जेथे विद्यार्थी प्रयत्‍न करण्‍यासोबत डिजिटल युगामध्‍ये यशस्‍वी होऊ शकतात.”

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत एचसीसीबीचे चीफ पब्लिक अफेअर्स, कम्‍युनिकेशन्‍स अँड सस्‍टनेबिलिटी ऑफिसर हिमांशू प्रियदर्शी म्‍हणाले, “आमच्‍या सीएसआर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून आमचा भारतभरातील समुदायांमध्‍ये दीर्घकालीन, सकारात्‍मक परिवर्तन घडवून आणण्‍याचा मनसुबा आहे. झेडपीपीएस निरगुडसर येथे डिजिटल स्‍मार्टबोर्ड्सच्‍या लाँचमधून शिक्षण अधिक उपलब्‍ध होण्‍याजोगे व प्रभावी करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. क्‍लासरूम्‍समध्‍ये तंत्रज्ञानाचा समावेश करत आम्‍ही विशेषत: संसाधने मर्यादित असलेल्‍या वंचित भागांमधील विद्यार्थ्‍यांना सक्षम करत आहोत, तसेच त्‍यांना त्‍यांच्‍या संपूर्ण क्षमता दर्शवण्‍यास मदत करत आहोत.”

तसेच, एचसीसीबी तालुका जुन्‍नर, जिल्‍हा पुणे येथील आने गावामध्‍ये डिजिटल लाँच सुरू करत आहे. जांभोरी गाव, तालुका आंबेगाव, जिल्‍हा पुणे येथे डिजिटल स्‍मार्टबोर्ड व आरओ फिल्‍टर देखील लाँच करण्‍यात आले आहे. तसेच, गुंजाळवाडी गाव, तालुका जुन्‍नर, जिल्‍हा पुणे येथे आरओ फिल्‍टर बसविण्यात येणार येणार आहे. या उपक्रमाचा विद्यार्थ्‍यांना शुद्ध पिण्‍याचे पाणी आणि पुरेशा स्‍वच्‍छता सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याचा मुख्‍य उद्देश आहे. यामुळे शाळेच्‍या पायाभूत सुविधांमध्‍ये सुधारणा होण्‍यासोबत विद्यार्थ्‍यांसाठी आरोग्‍यदायी वातावरणाला चालना मिळण्‍याची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments