Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्मरण राजकवींचे कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध

स्मरण राजकवींचे कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध

पुणे,23 जानेवारी 2025 : राजकवी भा.रा.तांबे यांच्या 151 व्या जयंती वर्ष निमित्त आयोजित उपक्रमांचा एक भाग असलेल्या स्मरण राजकवींचे या कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.ज्योत्सना भोळे सभागृह येथे तांबे कुटुंबियांतर्फे आयोजित मधु मागसी माझ्या .. एक आदरांजली या कार्यक्रमाचा हा एक भाग होता. तांबे कुटुंबियांचे स्नेही सुधीर मोघे प्रस्तुत आणि सृजन-स्नेही निर्मित स्मरण राजकवींचे हा कार्यक्रम सर्वत्र गाजत आहे.या कार्यक्रमात भा.रा.तांबे यांच्या निवडक 20 कवितांचे सादरीकरण करण्यात आले.या कार्यक्रमात स्वत: सुधीर मोघे, अनुपमा कुलकर्णी,शुभांगी मांडे यांनी काव्यवाचन केले.तर ज्येष्ठ गायक सीएम देशपांडे आणि उदयोन्मुख गायिका वृंदा वाटवे देवधर या कलाकारांनी सुरेल गायन केले.तबला व संवादिनीच्या सक्षम साथीने सादरीकरणात मोलाची भर पडली. तिन्ही सांजा सखे मिळाल्या,अनंता तुझे गोल तारे तुझे,घन तमि शुक्र बघ राज्य करी,सहज चालणे तुझे.. सहज बोलणे तुझे, निजल्या तान्ह्या वरी यासारख्या कवितांनी रसिकांना भारावून टाकले. श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली आणि एका अविस्मरणीय कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments