पुणे, 23 जानेवारी 2025: देशात, विदेशांमध्ये आणि जागतिक पातळीवर घडणाऱ्या घटनांमुळे बाजारपेठेत उतारचढाव होत असताना देखील भारतीय इक्विटीजनी सलग नवव्या वर्षी २०२४ मध्ये गुंतवणूकदारांना सकारात्मक परिणाम मिळवून दिले. बेंचमार्क निफ्टी ५० ने सरत्या वर्षाचा निरोप घेताना जवळपास ९% परतावा दिला.
पण, बाजारपेठेतून मिळणाऱ्या परताव्यांमध्ये वाढ होण्याचा वेग मात्र कमी झाला आहे. भू-राजकीय तणाव, मंदावलेली देशांतर्गत आर्थिक वृद्धी, कॉर्पोरेट उत्पन्नातील घट आणि महागाई आणि उच्च व्याजदरांमुळे शहरांमध्ये खरेदी व वस्तूंच्या वापरात आलेली घट यासारखे विविध देशांतर्गत आणि जागतिक घटक याला कारणीभूत आहेत.
इतकेच नव्हे तर, कमॉडिटीज, भू-राजकीय तणाव यासारखे अनेक बाह्य घटक नजीकच्या काळात बाजारात अस्थिरता निर्माण करू शकतात. या अनिश्चिततेला तोंड देताना गुंतवणूकदारांनी जोखीम आणि परतावा यामध्ये संतुलन साधणारे गुंतवणूक धोरण स्वीकारणे अधिक महत्त्वाचे ठरते.
वैविध्यपूर्ण गुंतवणूक दृष्टिकोन गरजेचा
बाजारपेठेत अस्थिरता असताना, वेगवेगळ्या संपत्तींमध्ये फंड्सचे वाटप करणे हा एक विवेकपूर्ण गुंतवणूक उपाय आहे, त्यामुळे वेगवेगळ्या इक्विटीज, निश्चित उत्पन्न, कमॉडिटीज आणि पर्यायी संपत्ती यांचे लाभ मिळतात. मजबूत आर्थिक वाढीच्या काळात इक्विटी भरभराटीला येतात, तर आर्थिक मंदीच्या काळात बाँड्स स्थिरता प्रदान करतात. सोन्यासारख्या वस्तू महागाई आणि अनिश्चिततेच्या काळात उपयोगी ठरतात. संपत्तीचे डायनामिक वाटप करून, वेगवेगळ्या संपत्तींमध्ये फंड्सचे वाटप करून जोखीम आणि परतावा यामध्ये संतुलन साधता येते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना बाजार चक्रांमध्ये संधी मिळवता येतात आणि नकारात्मक जोखीम कमी करता येते.
टाटा म्युच्युअल फंडमधील इक्विटीजचे सीआयओ श्री राहुल सिंग म्हणाले, “वेगवेगळ्या संपत्तींमध्ये वाटपाची धोरणे असलेला एक सुसंतुलित पोर्टफोलिओ हा जोखीम व्यवस्थापित करण्याचा आणि वेगवेगळ्या संपत्ती वर्गांमधील संभाव्य संधींचा फायदा घेण्याचा एक मार्ग प्रदान करतो. अनेक मालमत्ता वर्गांमध्ये धोरणात्मक वाटप करून, हे फंड अधिक लवचिक दीर्घकालीन वाढीची क्षमता देऊ शकतात, विशेषतः बाजारातील अशांततेच्या काळात उपयुक्त ठरतात.”
टाटा मल्टी अॅसेट अपॉर्च्युनिटीज फंड (इक्विटी, कर्ज आणि एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्जमध्ये गुंतवणूक करणारी एक ओपन-एंडेड योजना) मध्ये पश्चिम भारतातील पुणे येथून सर्वात जास्त इनफ्लो दिसून आला. एप्रिल ते डिसेंबर २०२४ दरम्यान, या फंडला ६८ कोटी रुपयांचा इनफ्लो मिळाला, जो २०२३ मध्ये याच कालावधीत ५० कोटी रुपये होता.
काही ठाम अंदाज लावता येणार नाही अशा बाजारपेठेत संभाव्य स्थिरता शोधू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी, मल्टी-ऍसेट अलोकेशन फंड एक सर्वसमावेशक उपाय प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतात. सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIPs) द्वारे गुंतवणूक केल्याने हे धोरण आणखी प्रभावी बनते, कारण त्यामुळे रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग सक्षम बनते इतकेच नव्हे तर, शिस्तबद्ध, दीर्घकालीन संपत्ती निर्मितीला देखील प्रोत्साहन मिळते.
मध्यमवर्गाची वाढती संख्या आणि इक्विटी एक्सपोजरची वाढती मागणी लक्षात घेता, मल्टी-ऍसेट अलोकेशन फंड्स अनिश्चित बाजारपेठेत संपत्ती निर्मितीसाठी एक स्मार्ट, समग्र दृष्टिकोन प्रदान करण्याचा प्रयत्न करतात.


