पुणे, दि. 23 : शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथे सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक ॲण्ड कल्चर अमंग्स्ट युथ (एसपीआयसी एमएसीआयए) हेरिटेज क्लब तर्फे शुक्रवार 24 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता विदुषी रेंजिनी के. पी. यांचा ‘कथकली’ नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच संस्थेचे स्नेहसंमेलन 25 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.
एसपीआयसी एमएसीआयए समारंभाचे आयोजन संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील आणि क्लबचे समन्वयक सुहास परांजपे तसेच सचिव श्रीमती कोल्हे यांनी केले आहे. अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय लोकसंगीत, शास्त्रीय संगीत व शास्त्रीय नृत्य याची ओळख होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.
संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार 25 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एव्हरेस्टवीर किशोर धनकुडे उपस्थित राहणार आहेत, असे संस्थेच्या प्राचार्यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
0000


