Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा पॉवरची सोलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, टीपी सोलर लिमिटेडला मिळाले ४५५ कोटी रुपयांचे...

टाटा पॉवरची सोलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, टीपी सोलर लिमिटेडला मिळाले ४५५ कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट, महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडला पुरवणार ३०० मेगा वॅट पीकची एएलएमएम मॉड्युल्स

मुंबई, २८ जानेवारी २०२५: टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या (टीपीआरईएल) संपूर्ण मालकीची उपकंपनी टीपी सोलर लिमिटेडने (टीपी सोलर) महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनी लिमिटेडसोबत (एमएसपीजीसीएल) एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या (एमएसकेव्हीवाय) २.० प्रोजेक्टसाठी टीपी सोलर ३०० मेगावॅट क्षमतेची एएलएमएम-प्रमाणित सौर मॉड्युल्स पुरवेल.

जवळपास ४५५ कोटी रुपयांचे हे महत्त्वाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून टीपी सोलरने भारतात उच्च दर्जाच्या सौर मॉड्युल्सचे विश्वसनीय पुरवठादार म्हणून स्वतःचे आघाडीचे स्थान अधोरेखित केले आहे. या वर्षभरात एएलएमएम-प्रमाणित मॉड्यूल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरवली जातील. हे कॉन्ट्रॅक्ट एमएसपीजीसीएलच्या मोठ्या ७५० मेगावॅट क्षमतेच्या टेंडरचा एक भाग आहे. स्पर्धात्मक ई-रिव्हर्स बोली (ईआरए) प्रक्रियेमार्फत या टेंडरवर निर्णय देण्यात आला आहे.

टीपी सोलर लिमिटेडने तामिळनाडूमधील तिरुनेलवेलीमध्ये भारतातील सर्वात मोठा सिंगल-लोकेशन, सौर सेल, मॉड्युल्स बनवण्याचा प्लांट उभारला आहे. सेल आणि मॉड्युल्ससाठी ४.३ गिगावॅट (GW) क्षमतेची ही अत्याधुनिक सुविधा भविष्यातील विस्तार ध्यानात घेऊन खुल्या जागांसह डिझाईन करण्यात आली आहे. टाटा पॉवरने आपली उपकंपनी टीपीआरईएलमार्फत या प्लांटच्या स्थापनेसाठी जवळपास ४३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सौर मूल्य शृंखलेमध्ये स्वदेशीकरण आणि सौर सेल, मॉड्युल्स उत्पादन या दोन्हींमध्ये आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

प्रगत TOPCon आणि मोनो PERC तंत्रांनी सुसज्ज असलेल्या या प्लांटमध्ये भारतात तयार करण्यात आलेल्या सेलचा उपयोग करून ALMM-प्रमाणित मॉड्युल्स आणि DCR मॉड्युल्स देखील बनवली जातात. हा उपक्रम स्थानिक उत्पादन क्षमतांसह नेट झिरो कार्बन भविष्यासाठी भारताच्या दृष्टिकोनाचे समर्थन करण्याच्या कंपनीच्या

वचनबद्धतेशी सुसंगत आहे, त्यासोबतच सौर रुफटॉप आणि युटिलिटी-स्केल सेगमेंट्समध्ये कंपनीचे आघाडीचे स्थान मजबूत करतो.

हा महत्त्वपूर्ण सहयोग अक्षय ऊर्जा उपाययोजनांमध्ये नावीन्य आणि उत्कृष्टतेला पुढे नेण्यासाठी टीपी सोलरची वचनबद्धता दर्शवतो. प्रगत तंत्रज्ञान आणि शाश्वत प्रथांवर ध्यान केंद्रित करत कंपनी भारताच्या ऊर्जा परिवर्तनामध्ये योगदान देण्यासाठी, प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वांसाठी हरित भविष्य निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments