Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedपूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांची पुण्यात अध्यात्मिक प्रवचने* *तीन दिवसीय उत्सवाचे...

पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांची पुण्यात अध्यात्मिक प्रवचने* *तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन ; सर्वांना विनामूल्य प्रवेश*

पुणे : आध्यात्मिक आर्षद्रष्टा, जागतिक मानवतावादी आणि श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक पूज्य गुरुदेवश्री राकेशजींच्या पावन उपस्थितीत तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. गुरुवार, दि.३० जानेवारी ते शनिवार १ फेब्रुवारी या तीन दिवसांत रात्री ८ ते १० यावेळेत गणेश कला क्रीडा मंच येथे पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांचे प्रेरणादायी आध्यात्मिक प्रवचन होणार आहे.

तीन दिवसांच्या उत्सवात आध्यात्मिक प्रवचने, ध्यान आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या उत्सवातून उपस्थित पुणेकर रोजच्या धकाधकीतून सुटका करून मनाला शांतता देऊ शकतील, जीवनाचा नवीन दृष्टिकोन विकसित करू शकतील आणि वैयक्तिक तसेच आध्यात्मिक प्रगतीचा प्रवास सुरू करू शकतील. सनातन आध्यात्मिक तत्वज्ञान सुलभतेने मांडण्याची आणि जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची विलक्षण क्षमता असलेल्या पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांचे उपदेश भौगोलिक व सांस्कृतिक सीमा ओलांडून प्रत्येकाला सत्य आणि जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी प्रेरित करतात.

पूज्य गुरुदेव श्री राकेशजी आपल्या धर्मयात्रांद्वारे जगभरातील साधकांना प्रेरणा देतात, त्यांना आपल्या शहरातच आंतरिक शांती, निःस्वार्थता आणि जीवनाच्या उद्देशाचा नवा दृष्टिकोन अनुभवण्याची संधी प्रदान करतात. आगामी पुणे धर्मयात्रा हाच एक प्रयत्न असून साधकांना आध्यात्मिक सत्य आणि परिवर्तनाच्या साराशी जोडणारा एक अनुभव आहे.

पूज्य गुरुदेव श्री राकेशजी हे एक आत्मज्ञानी गुरू, आध्यात्मिक द्रष्टा, आणि श्रीमद् राजचंद्रजींचे परम भक्त आहेत. ते श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक आहेत ज्याची जगभरातील २०६ केंद्रे, ९६ यूथ ग्रुप आणि २५० हून अधिक बाल मूल्य शिक्षण केंद्र आहे. ज्ञानवर्धक प्रवचने आणि ध्यानधारणेतून त्यांनी असंख्य जीवन उजागर केले आहे. पुण्यात होत असलेल्या उत्सवाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments