Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedगॅलॅक्‍सी एस२५ सॅमसंगचा सर्वोत्तम स्‍मार्टफोन आहे, तुमचा खरा एआय सोबती: टीएम रोह

गॅलॅक्‍सी एस२५ सॅमसंगचा सर्वोत्तम स्‍मार्टफोन आहे, तुमचा खरा एआय सोबती: टीएम रोह

गॅलॅक्‍सी एस२५ आतापर्यंतचा सॅमसंगचा सर्वोत्तम स्‍मार्टफोन आहे, असे कंपनीचे अध्‍यक्ष आणि मोबाइल एक्‍स्‍पेरिअन्‍स डिव्हिजनचे प्रमुख टीएम रोह म्‍हणाले.

ते पुढे म्‍हणाले, ”गॅलॅक्‍सी एस२५ सर्वात स्लिम व सर्वात टिकाऊ स्‍मार्टफोन, जो कॅमेरा व बॅटरीसाठी हार्डवेअरमधील अद्वितीय नेतृत्‍वासह येतो. या स्‍मार्टफोनमध्‍ये फक्‍त गॅलॅक्‍सीसाठी असलेले बेस्‍ट-परफॉर्मिंग कस्‍टमाइज्‍ड प्रोसेसर देखील आहे. आमच्‍या एस सिरीजच्‍या उल्‍लेखनीय कॅमेरा अनुभवाला गॅलॅक्‍सी एआयसह अधिक संपन्‍न करण्‍यात आले आहे, ज्‍यामधून एआय-समर्थित इमेज क्‍वॉलिटी आणि इमेज एडिटिंग क्षमतांची खात्री मिळते.”

रोह म्‍हणाले की, भारतातील ग्राहक नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्यांना अधिक प्राधान्‍य देतात आणि भारतात एआय वैशिष्‍ट्यांचा वापर जागतिक सरासरीपेक्षा अधिक आहे. याच कारणामुळे गॅलॅक्‍सी एस२५ मधील नवीन एआय वैशिष्‍ट्ये हिंदी भाषेमध्‍ये विकसित करण्‍यात आले आहेत, जेथे सुरूवातीपासून हिंदी भाषेला अव्‍वल प्राधान्‍य देण्‍यात आले आहे.

रोह पुढे म्‍हणाले, ”गॅलॅक्‍सी एस२५ मध्‍ये गुगल जेमिनी लाइव्‍ह कोरियन, इंग्रजी व हिंदी भाषेमध्‍ये देण्‍यात येईल. यासह, आम्‍ही गॅलॅक्‍सी एस२५ जेमिनी लाइव्‍ह या तीन भाषांमध्‍ये सादर करत आहोत आणि त्‍यानंतर इतर भाषांमध्‍ये देखील विस्‍तार करू. यामधून आमच्‍यासाठी भारतातील बाजारपेठेचे महत्त्व दिसून येते.”

सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍टच्‍या माध्‍यमातून वैयक्तिक माहितीसाठी सर्वोत्तम संरक्षण आणि सुरक्षित व विश्‍वसनीय एआय वापर देते, ज्‍यामुळे ग्राहकांना त्‍यांच्‍या गोपनीयतेबाबत चिंता करण्‍याची गरज लागणार नाही, असे रोह म्‍हणाले.

ते पुढे म्‍हणाले, ”आम्‍ही डिवाईस व क्‍लाऊडवर एआय डेटा-संचालित वापरासाठी गोपनीयतेचे संरक्षण देतो, तसेच वापरकर्त्‍यांना ऑप्‍टींग इन किंवा ऑप्‍टींग आऊटचा पर्याय देखील देतो.”

भारत गॅलॅक्‍सी एआय विकास व विक्रीमध्‍ये सॅमसंगसाठी सर्वात महत्त्वपूर्ण देश आहे आणि आम्‍ही नेहमी या देशाला प्राधान्‍य देत राहू, असे रोह म्‍हणाले.

सॅमसंगने नुकतेच घोषणा केली की, भारतातील ग्राहक गॅलॅक्‍सी एस२५ अल्‍ट्रा, गॅलॅक्‍सी एस२५+ आणि गॅलॅक्‍सी एस२५ प्री-ऑर्डर करू शकतात. गॅलॅक्‍सी एस२५ सिरीजची किंमत ८०,९९९ रूपयांपासून सुरू होत टॉप अल्‍ट्रा मॉडेलसाठी १.६५ लाख रूपयांपर्यंत जाते, जो १२ जीबी रॅम आणि १ टीबी मेमरीसह येतो. गॅलॅक्‍सी एस२५ अल्‍ट्रा प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना २१,००० रूपयांचे फायदे मिळू शकतात, असे कंपनीने सांगितले.

भारतात विक्री करण्‍यात येणा-या गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज स्‍मार्टफोन्‍सचे उत्‍पादन नोएडामधील सॅमसंगच्‍या स्‍मार्टफोन फॅक्‍टरीमध्‍ये केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments