पुणे : मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी भाषेचा न्यूनगंड दूर करण्यासाठी श्रीकांत भावे स्मृती करंडक इंग्रजी संवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत छोट्या गटात अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स तर मोठ्या गटात सुंदरबाई मराठे विद्यालय खराडी हायस्कूल यांनी विजेतेपद पटकावले आहे.
नातूबाग परिसरातील आदर्श शिक्षण मंडळी, माजी विद्यार्थी संघटनेतर्फे श्रीकांत भावे स्मृती करंडक ‘इंग्रजी संवाद स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळीचे विश्वस्त व ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले. स्पर्धेचे उद्घाटन वंदना भावे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संदीप गायकवाड, खजिनदार रेखा मोरे, स्पर्धा प्रमुख प्रशांत मते, डी.पी.जोशी, शिरीष मोहिते, सारिका सणस, अंजली धुमाळ, प्रदीप अष्टपुत्रे, वंदना भावे, देवेंद्र भावे, नितीन होले, गिरीष भोईटे, आनंद आंबेकर, नयना नाईक, राधिका मंडलिक, किरण रासकर, सुरेश तरलगट्टी उपस्थित होते. स्पर्धेचे यंदा १३ वे वर्ष होते. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण मेघना भावे अभ्यंकर व मुग्धा महादेव कुलकर्णी यांनी केले.
पराग ठाकूर म्हणाले, शालेय जीवनात केवळ शिक्षणाने नाही तर स्पर्धांमुळे विद्यार्थी घडत असतो. मुलांमधील उर्जा ओळखा आणि त्या उर्जेला योग्य दिशा दाखवा. तरुणाईच्या ऊर्जेला योग्य दिशा मिळाली तर देश नक्कीच प्रगती करेल. स्वामी विवेकानंद आणि मुक्ताईचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. अरुण पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. डी.पी.जोशी यांनी आभार मानले.
अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, सुंदरबाई मराठी विद्यालय खराडी प्रशालेला विजेतेपद
निकाल : गट इयत्ता ५वी ते ७वी
१) अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स २) रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल ३) श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय चऱ्होली, उत्तेजनार्थ : एच.एच.सी.पी हायस्कूल हुजूरपागा, उत्तेजनार्थ (उपनगर व ग्रामीण) : सुंदरबाई मराठे विद्यालय खराडी, लेखन : सोनल सोनवणे (गेनबा सोपानराव मोझे विद्यालय येरवडा), दिग्दर्शन : वसंत सुर्वे (अभिनव विद्यालय मराठी माध्यम कर्वे रोड), अभिनय : मनस्वी देशमुख (रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल)
गट इयत्ता ८वी ते १०वी १) सुंदरबाई मराठे विद्यालय खराडी २) हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय ३) गेनबा सोपानराव मोझे विद्यालय, व सयाजीनाथ महाराज विद्यालय चाऱ्होली, उत्तेजनार्थ : माधव सदाशिव गोळवलकर, उत्तेजनार्थ (उपनगर व ग्रामीण) : अभिजात माध्यमिक शाळा, कर्वेनगर, लेखन : ज्योती गोरे ( हुजूरपागा ), दिग्दर्शन : वर्षा कुलकर्णी (अहिल्यादेवी), अभिनय : तेजस्विनी जोशी (रेणुका स्वरूप)


