Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा १७ वर्षाखालील गटासाठी फुटबॉल स्पर्धेचे...

ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा १७ वर्षाखालील गटासाठी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

मुंबई, २७ जानेवारी २०२५: ड्रीम स्पोर्ट्सची परोपकारी शाखा असलेल्या ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन (डीएसएफ) ने आज ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली.‌ ही स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात आयोजित केली जाणार असून त्यामध्ये मुलींच्या सतरा वर्षाच्या गटातीलही फुटबॉल सामने आयोजित केले जाणार आहेत

गतवर्षी त्यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत अतिशय भरघोस प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे यंदाही त्यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरू होणारी ही स्पर्धा सहा शहरांमध्ये आयोजित केली जाईल, त्यामध्ये
मध्ये प्रादेशिक फेरी आणि राष्ट्रीय अंतिम फेरीचा समावेश आहे. दोन-टप्प्यां मध्ये या सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे. पहिला टप्पा २ ते ८ फेब्रुवारी पर्यंत चालेल, ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू येथे स्पर्धात्मक सामने असतील. त्यानंतर दुसरा टप्पा १० ते १४ फेब्रुवारी पर्यंत असेल, हे सामने गुवाहाटी आणि गोवा येथे आयोजित केले जाणार आहेत.
राष्ट्रीय अंतिम फेरी ५ ते १७ एप्रिल दरम्यान गोव्यात होणार आहे,

ही स्पर्धा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (ए आय एफ एफ) भारतीय राष्ट्रीय संघासाठी संभाव्य युवा प्रतिभा ओळखण्यास देखील मदत करेल.

ड्रीम स्पोर्ट्सचे सीओओ आणि सह-संस्थापक भावित शेठ म्हणाले, “आमच्या पहिल्या चॅम्पियनशिपच्या यशावर आधारित, आम्हाला यावर्षी व्यापक स्तरावर पोहोचण्याची आम्हाला खात्री आहे. पोहोच आणि प्रभावासह ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा करताना अभिमान वाटतो. या वर्षी मुलींची स्पर्धा आयोजित करण्याबाबत आम्ही उत्सुक आहोत. हा उपक्रम शाश्वत कार्यक्रमांच्या विकासाद्वारे तळागाळातील प्रतिभेला उत्तम संधी देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments