पुणे, दि. 29: पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून फेब्रुवारी महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे 3 व 4 फेब्रुवारी, मंचर येथे 10 व 11 फेब्रुवारी, जुन्नर येथे 13 व 14 फेब्रुवारी, वडगाव मावळ येथे 24 व 25 फेब्रुवारी तर लोणावळा येथे 27 व 28 फेब्रुवारी या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा 30 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
****


